मंत्रालयातील Internet सेवा तासाभरापासून ठप्प; अनेक कामं खोळंबली

78

गेल्या एक ते दीड महिन्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यादरम्यान, राजकीय घडामोडींमध्ये रखडलेली कामे करण्यासाठी राज्यातील अनेकांनी मंत्रालयात धाव घेतली. मात्र मंत्रालयातील इंटरनेट सेवा गेल्या तासाभरापासून ठप्प असल्याने मंत्रालयात लोकांना एन्ट्री मिळत नाहीये. गेल्या तासाभरापासून लोकं रांगेत उभे असून त्यांना इंटरनेट अभावी पास मिळणं कठीण झाले असून त्याकरता त्यांना वाट बघावी लागत आहे.

(हेही वाचा – बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत केसरकरांचे मोठं विधान ; म्हणाले, ‘त्यांना लवकरच…’)

दरम्यान, मंत्रालयातील इंटरनेट सेवा काही तांत्रिक कारणामुळे विस्कळीत झाली असून, विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना प्रवेश पास मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या तासाभरापासून ही सेवा विस्कळीत झाली असून याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने मंत्रालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली असून अनेकांचा यामुळे खोळंबा झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

आज, गुरूवारी रक्षाबंधन असले तरी नुकताच शपथविधी झाल्याने तसेच मोठी सुटी लागणार असल्याने आज मंत्रालयातील कामं सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंत्रालयात कोणत्याही कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्वात प्रथम पास काढणे अनिवार्य असते. मात्र, गेल्या तासाभरापासून येथील इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी गार्डन गेट येथे पास वितरित केले जातात. परंतु, येथील इंटरनेट सेवा काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली असून, सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे येथील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.