1947 पासून आजपर्यंत भारताने अनेक क्षेत्रांत विकासाचे नवनवे झेंडे रोवले आहेत. भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतासाठी 1995 हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. कारण, 1995 मध्येच इंटरनेटने भारतात प्रवेश केला. याच इंटरनेटने भारतात क्रांती आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
इंटरनेट देशात आल्यानंतर, अवघ्या दोन दशकांतच भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली. परंतु आधी फक्त शिक्षण आणि संशोधनासाठी इंटरनेटचा वापर केला जात असे. एनसीएसटी आणि आयआयटी मुंबईदरम्यान, ई-मेल पाठवण्यासाठी डायल अप सेवा 1986 मध्ये सुरु झाली होती. शिक्षणासाठी इंटरनेटचा वापर करण्यात येत होता. पण 1995 मध्ये ते व्यावसायिक पातळीवर सुरु झाले.
( हेही वाचा: प्रसारमाध्यमांच्या ‘न्यूड’ बातम्या, लोकशाहीचा चौथा स्तंभ घसरलाय )
इंटनेटसाठी मोजावे लागायच 75 हजार रुपये
- इंटरनेट खूप महाग होते, असे म्हटले जाते की, तेव्हा स्पीड 10 केबीपीएसपेक्षाही कमी होता, 240 तास इंटरनेटसाठी 75 हजार रुपये मोजावे लागायचे. त्याकाळात व्यावसायिक, गैर- व्यावसायिक, निर्यातदार वा सेवा पुरवठादारांना वेगवेगळ्या दरात इंटरनेट मिळत असे. तसेच, त्यांचे प्लॅन 9.6 केबीपीएस, 64 केबीपीएस आणि 128 केबीपीएस स्पीडवर आधारित होते.
- 2016 मध्ये जीओ 4 जीचा प्रवेश झाला आणि लोकांना मोफत इंटरनेट मिळू लागले. यानंतर सर्व कंपन्यांना 4 जी सेवा द्यावी लागली आणि भारतात इंटरनेट जगातील कोणत्याही देशापेक्षा स्वस्त झाले.
- 2022 मध्ये आता काही दिवसांमध्येच 5 जी सेवेलाही सुरुवात होईल. सुरुवातीच्या काळात लोक केवळ संगणकाद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकत होते. परंतु आता मोबाईल फोनद्वारे इंटरनेट हे सर्वांच्या खिशात पोहोचले आहे. 1995 मध्ये आलेल्या इंटरनेटचे आता महाजाळे पसरले आहे.