MS Golwalkar : संघ दक्ष; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा परिचय

१९४७ साली भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी माधवराव आणि इतर स्वयंसेवक हे पाकिस्तानमधल्या भागातून हिंदू बांधवांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

243
MS Golwalkar : संघ दक्ष; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा परिचय

माधवराव सदाशिवराव गोळवलकर (MS Golwalkar) यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९०६ साली महाराष्ट्रातल्या रामटेक नावाच्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सदाशिवराव होतं. त्यांना भाऊजी या नावाने सगळे ओळखायचे. त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई होतं. त्यांना सगळेजण ताई म्हणून हाक मारायचे. सुरुवातीला सदाशिवराव हे भारतीय पोस्टात तार विभागात काम करायचे. पण नंतर १९०८ साली त्यांची नियुक्ती शिक्षण विभागात करण्यात आली. (MS Golwalkar)

माधवराव गोळवलकर (MS Golwalkar) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक आणि विचारवंत होते. त्यांचे शिष्य त्यांना गुरुजी म्हणून हाक मारायचे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच त्यांच्या बाबांनी त्यांच्या शिक्षणाला सुरुवात केली होती. त्यांचे बाबा स्वतः त्यांना शिकवायचे. माधवराव लहानपणापासूनच कुशाग्र, जिज्ञासू आणि अफाट स्मरणशक्ती असलेले होते. गुरुजींनी मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर विज्ञान विषयात इंटरमेडीएट तसेच इंग्रजी विषयात पहिले पारितोषिक मिळवले. माधवराव खेळांतही निपुण होते. बनारस हिंदू विश्वविद्यालयात त्यांनी जीवशास्त्राचा अभ्यास केला होता. याव्यतिरिक्त त्यांनी संस्कृत मधली महाकाव्ये, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद इत्यादी महापुरुषांची चरित्रे तसेच वेगवेगळ्या उपासना पंथांचा मन लावून अभ्यास केला. (MS Golwalkar)

विश्वविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर माधवराव (MS Golwalkar) मद्रास (चेन्नई) येथे एका मत्स्यालयात मत्स्यजीवनावर रिसर्च करण्यासाठी गेले. त्यानंतर एक दोन वर्षांत त्याचे बाबा सेवानिवृत्त झाले. मग ते नागपुरात परत आले. परतल्यावर त्यांना बनारस हिंदू विश्वमहाविद्यालयातून जीवशास्त्र विभागात मार्गदर्शन करण्यासाठी नोकरीचा प्रस्ताव दिला गेला. त्यांनी तो स्वीकारलाही. पण हे कायमचे काम नव्हते म्हणून माधवराव थोडे चिंतेत असायचे. अध्ययनात मार्गदर्शन करणे हा त्यांच्या आयुष्यातील एक भाग बनून राहिला होता. ते विद्यार्थी दशेत असताना आपल्या मित्रांनाही विज्ञान, इंग्रजी, गणित, जीवशास्त्र इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करायचे. (MS Golwalkar)

(हेही वाचा – Shiv Jayanti 2024 : शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महाराजांचा पाळणा हलवला)

संघ वाढीचे श्रेय गोळवलकर गुरुजींना

नागपुरातल्या भैय्याजी दाणी नावाच्या एका स्वयंसेवकांच्या माध्यमातून माधवराव सदाशिवराव गोळवलकर (MS Golwalkar) यांचा संघामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर राष्ट्रकार्य त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) यांच्यासोबत काम करताना त्यांनी राष्ट्रकार्यासाठी संपूर्ण समर्पणाची भावना ठेवली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन सरसंघचालकांनी माधवरावांना सहकार्यवाह म्हणून नेमले. १९४७ साली भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी माधवराव आणि इतर स्वयंसेवक हे पाकिस्तानमधल्या भागातून हिंदू बांधवांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या सर्व स्वयंसेवकांनी त्यावेळी दाखवलेली हिंमत आणि बलिदान यांची तुलना करताच येत नाही. (MS Golwalkar)

एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) यांना ताप आला होता. त्यांचा ताप कमी होतंच नव्हता. त्यावेळी त्यांनी आपल्या जवळच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं. त्यामध्ये माधवराव सदाशिवराव गोळवलकरसुद्धा (MS Golwalkar) होते. सरसंघचालकांनी त्यांच्या पश्चात संघाचं कार्य सांभाळण्याची जबाबदारी माधवराव गोळवलकर (MS Golwalkar) यांच्या खांद्यावर दिली. २१ जून १९४० साली पाहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) हे अनंतात विलीन झाले. त्यानंतर माधवराव सदाशिवराव गोळवलकर (MS Golwalkar) यांनी दुसरे सरसंघचालक म्हणून धुरा सांभाळत संघाचं कार्य पुढे सुरू ठेवलं. आज संघ वाढला त्याचं श्रेय गोळवलकर गुरुजींना जातं. आज स्वयंसेवक असणे म्हणजे आदराचे मानले जाते. स्वयंसेवक आणि प्रचारक हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. देशाच्या जडणघडणीत संघाचा खूप मोठा वाटा आहे. (MS Golwalkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.