Gujarati Literary : कादंबरीकार, कवी आणि नाटककार मुकुंद परीख

गुजराती साहित्याने भारतीय साहित्याला पुष्कळ काही दिले आहे. यामध्ये अनेक गुजराती साहित्यिकांचे योगदान मोलाचे आहे. त्यापैकी एक साहित्यिक म्हणजे मुकुंद परीख.

187
Gujarati Literary : कादंबरीकार, कवी आणि नाटककार मुकुंद परीख

गुजराती साहित्याने भारतीय साहित्याला पुष्कळ काही दिले आहे. यामध्ये अनेक गुजराती साहित्यिकांचे योगदान मोलाचे आहे. त्यापैकी एक साहित्यिक म्हणजे मुकुंद परीख. मुकुंद परीख यांचा जन्म २६ जानेवारी १९३४ रोजी नदिसर गावात झाला. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी बालसिनोर येथे पूर्ण केले. (Gujarati Literary)

पुढे धर्मेंद्रसिंहजी कॉलेज, राजकोट येथून १९५७ मध्ये अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. १९५४ ते १९८० या काळात भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयात त्यांनी नोकरी केली. त्यांनी १८८० मध्ये गुजरात विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षणदेखील घेतले होते. पुढे १९८१ पासून ते वकील म्हणून कार्यरत झाले. (Gujarati Literary)

(हेही वाचा : Republic Day 2024 : २६ जानेवारीला ३५० किल्ल्यांवर फडकणार तिरंगा आणि भगवा ध्वज)

२००४ मध्ये प्रकाशित झालेल्या ’मन चित्तारी’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. १९६८ मध्ये प्रकाशित झालेली महाभिनिष्क्रमण ही त्यांची कादंबरी खूप गाजली. आई, पत्नी आणि प्रेयसी या तीन स्त्रियांवर असलेल्या प्रेमावर ही कादंबरी आधारित आहे. या त्यांच्या प्रयोगात्मक कादंबरीची खूप प्रशंसा झाली.

त्याचबरोबर रे मठ आणि मोक्ष या त्यांच्या नाटकांचा देखील बोलबाला झाला. आपली साहित्यकृती मांडण्याची त्यांची शैली अगदीच वेगळी होती. पात्रांची केलेली गुंफण वाखाणण्याजोगी होती. गुजराती नाट्यक्षेत्रांत अशा प्रकारच्या प्रायोगिक नाटकांना नेहमीच डोक्यावर घेतलं गेलं आहे. आजही वयाच्या ८९ व्या वर्षी मुकुंद परीख आपली लेखणी चालवत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.