अलिकडे लहान मुलांपासून, मोठ्यापर्यंत प्रत्येक जण वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साही असतो. वाढदिवशी केक कापणे, चेहऱ्यावर केक फासणे, वय वर्षाप्रमाणे पाठीत धपाटे मारणे अशा नवनवीन संकल्पना आजकाल प्रचलित आहेत. परंतु याच नव्या सेलिब्रेशन संकल्पना तुमचा घात करू शकतात, याच संबंधित एका उत्साही मित्रांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाढदिवस साजरा करणे या मित्रांना चांगलेत महागात पडले असून अतिउत्साहात मृत्यूला निमंत्रण दिल्याची दृष्ये या व्हिडिओतून समोर येत आहेत.
व्हिडिओ झाला व्हायरल
पाच ते सहा मित्रांचा ग्रुप वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्रित जमले असून अलिकडच्या ट्रेंडनुसार प्रत्येकाने वाढदिवस असलेल्या संबंधित मित्राच्या तोंडाला केक, अंडी फासली. तसेच त्याच्या पाठीत धपाटे, अतिउत्साहात लाथादेखील मारल्या. केक व अंड्यांचा भडीमार संपूर्ण अंगावर केल्यामुळे, वाढदिवस असलेल्या तरूणाला श्वास घेणेही, कठीण होऊन बसले. परिणामी तो तरूण जमिनीवर पडला, अशी विचलित करणारी दृष्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत व हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
( हेही वाचा : बीएमसीचा मोठा निर्णय! उद्यापासून नव्हे तर १५ डिसेंबरपासून शाळा होणार सुरु )
अतिउत्साहात झाला घात
तरुण जमिनीवर कोसळल्यावर मित्रांमध्ये एकच गोंधळ उडाला व त्यांंच्या अतिउत्साहावर पाणी फिरले. घाईगडबडीत मित्रांनी तरुणाला उचलले परंतु ज्या प्रकारे तरूण कोसळला त्यावरून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे या मित्रांच्या वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवर जनतेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Join Our WhatsApp Communityकेक खाऊन मृत्यूला निमंत्रण!, व्हिडीओ झाला व्हायरल… #BirthdayCake #Video @MumbaiPolice @MahaCyber1 @DGPMaharashtra pic.twitter.com/PWp6UMCfMK
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) November 30, 2021