IPL Match सुरू असतानाच वानखेडे स्टेडियमवर ‘अंधार’!

162

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघात आज आयपीएलचा सामना सुरू असतानाच सामान्याच्या सुरूवातीला स्टेडियमच्या काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे पहिल्या डावाच्या दोन षटकांसाठी DRS पद्धत उपलब्ध नव्हती. स्टेडियममधील विजेच्या समस्येमुळे नाणेफेकीलाही उशीर झाला. त्यामुळे मुंबईत वीज तुटवडा आहे याचा प्रत्यय आला आहे. बुधवार ११ मे रोजी सुद्धा मंत्रालयात कॅबिनेट सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाला होता.

( हेही वाचा : आता गुगल ट्रान्सलेटरवर संस्कृत, कोकणी आणि भोजपुरी भाषेचाही समावेश )

वीजपुरवठा खंडित

सामन्याच्या पहिल्या दोन षटकांमध्ये तीन विकेट्स गमावल्यामुळे या पॉवर फेल्युअरमुळे सीएसकेला मोठा अडथळा निर्माण झाला. डेव्हन कॉनवे एलबीडब्ल्यू आऊट झाला तर मोईन अली डॅनियल सॅम्सविरुद्धच्या पहिल्याच षटकात झेलबाद झाला. पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू झेलबाद केले. सीएसकेला या तीनपैकी दोन विकेट्सवर रिव्ह्यू घेता आला असता पण वीज पुरवठा खंडित झाल्याने रिव्ह्यू उपलब्ध नव्हता. डावाच्या दुसर्‍या षटकानंतर डीआरएस पुनर्संचयित करण्यात आला, परंतु सीएसकेने तेव्हा आधीच तीन विकेट गमावल्या होत्या.

दरम्यान, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. CSK गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे, त्यांनी गेल्या पाच सामन्यांमध्ये तीन विजय नोंदवले आहेत. त्यांच्या शेवटच्या सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी विजय मिळवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.