मुंबई महापालिका प्रशासकपदी ‘इक्बाल सिंह चहल’!

122

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आल्याने महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपवला गेला आहे. आणि प्रशासक म्हणून विद्यमान महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची नेमणूक करण्यात आली आहे. नगरविकास खात्याने चहल यांच्याकडे प्रशासक म्हणून कारभाराची सूत्रे हाती सोपवली आहे. त्यामुळे इक्बाल सिंह चहल हे आता मुंबई महापालिकेचे प्रशासक म्हणून कामकाज हाताळणार आहेत.

( हेही वाचा : आजीचे माजी झाले, पण पाच वर्षांत नगरसेवकांनी काय मिळवले? )

राज्य निवडणूक आयोगाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका नियोजित वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थाची मुदत संपताच तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम ६ घ्या तरतुदीनुसार पालिकेची मुदत पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे ही मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे कळवले.

प्रशासक पदी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती

त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ६क (१) व (२) मधील तरतुदीनुसार ०७ मार्च २०२२ रोजी ही मुदत संपत असलेल्या मुंबई महानगरपालिका प्रशासक पदी विद्यमान महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे नगरविकास खात्याने कळवले आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महानगरपालिकेची नियोजित मुदत संपताच प्रशासक म्हणून कार्यभार स्विकारावा तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे राज्यपाल यांच्या आदेशानुसार कळवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.