इराणच्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीला बेड्या! काय आहे प्रकरण?

130

ऑस्कर विजेती अभिनेत्री तारानेह अलीदूस्ती हिला इराणमध्ये हिजाबला विरोध केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. द सेल्समनची ऑस्कर विजेती अभिनेत्री तरानेह अलीदूस्ती हिच्या अटकेनंतर इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने उफाळून आली आहेत. देशभरात सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनांबाबत खोटेपणा पसरवल्याचा आरोप या अभिनेत्रीवर करण्यात आला आहे.

(हेही वाचा – बापरे! एअरपोर्टवर महिला प्रवाशाच्या शरीरातून काढल्या तब्बल कोकेननं भरलेल्या ८२ कॅप्सूल अन्…)

काय आहे प्रकरण?

एका आठवड्यापूर्वी अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. निदर्शनांदरम्यान झालेल्या कथित अत्याचारादरम्यान मारल्या गेलेल्या एका व्यक्तीला समर्थन देणारी ही पोस्ट होती. विशेष म्हणजे यापूर्वीही इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांना पाठिंबा दिल्याबद्दल फुटबॉलपटू, अभिनेते आणि अनेकांना अटक करण्यात आली आहे.

काय होती पोस्ट

38 वर्षीय अभिनेत्री अलीदूस्ती हिने तिच्या पोस्टमध्ये असे म्हटले की, ‘त्याचे नाव मोहसीन शेखरी होते. हा रक्तपात पाहणारी आणि कारवाई न करणारी प्रत्येक आंतरराष्ट्रीय संघटना मानवतेला लाज आणणारी आहे’. अभिनेत्री तिच्या पोस्टमध्ये ज्या शेखरीचा उल्लेख करत होती तिला तेहरानमध्ये रस्ता अडवून देशाच्या सुरक्षा दलाच्या सदस्यावर चाकूने हल्ला केल्याबद्दल 9 डिसेंबर रोजी इराणच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली.

इराणच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, अलीदूस्तीला यासाठी अटक करण्यात आले कारण, तिने आपल्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत. विशेष म्हणजे, १६ सप्टेंबर रोजी २२ वर्षीय महसा अमिनी हिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये निदर्शने सुरू आहेत. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणला सर्वात मोठ्या जनआंदोलनाचा सामना करावा लागत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.