इराणमध्ये हल्लेखोरांकडून अंदाधुंद गोळीबार; 5 ठार तर 10 जखमी

सौजन्य: एबीपी माझा

इराणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणधील सेंट्रल मार्केटमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इराणच्या IRNA वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण- पश्चिम इराणमधील इजेह शहरात गोळीबाराची ही घटना घडली. येथील मार्केटमध्ये हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, या घटनेची माहिती देताना, वृत्तसंस्था IRNAने सांगितले की, हल्लेखोर दोन मोटारसायकलवरुन एजेह शहराच्या सेंट्रल मार्केटमध्ये पोहोचले आणि तिथल्या जनतेवर तसेच सुरक्षा दलांवर गोळीबार केला, ज्यात पाच लोक ठार झाले आणि किमान 10 जखमी झाले. मात्र, आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

26 ऑक्टोबरला शिराज शहरात गोळीबार

इराणमध्ये अलीकडच्या काळात देशव्यापी निदर्शने होत आहेत, सुरक्षा दल आंदोलकांवर कारवाई करतानाही दिसत आहेत. निदर्शनांदरम्यान अनेक ठिकाणी हिंसक चकमकीही झाल्या आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी इराणच्या शिराज शहरातही गोळीबाराची बातमी समोर आली होती. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here