Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका!

434
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका!
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका!

इस्रायलने (Israel) ११ दिवसांपूर्वी इराणच्या (Iran) सिरीयातील दूतावासावर हल्ला (Iran Israel Attack) केला होता. त्यानंतर या दोन देशांतील तणाव कमालीचा शिगेला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचे (Iran Israel Attack) ढग दाटले आहेत. इराणने इस्त्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागून जग पुन्हा एकदा अशांत केलं आहे. त्यानुसार, भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना पश्चिम आशियायी देशांत जाण्यापासून रोखले होते. आता इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर भारताने आपली भूमिका जाहीर केली आहे. (Iran Israel Attack)

भारताची नेमकी भुमिका काय ?

दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले असून या देशातील भारतीय समुदायांच्या संपर्कात असल्याचं इस्रायलमधील (Iran Israel Attack) परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात एक्सवर भारताच्या बाजूचं निवेदन सादर केलं आहे. “इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या शत्रुत्वाबद्दल (Iran Israel Attack) आम्ही गंभीरपणे चिंता व्यक्त करत आहोत. या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे.” असं भारताने या निवेदनात म्हटलं आहे. (Iran Israel Attack)

“आम्ही तात्काळ डी-एस्केलेशन, संयम बाळगणे, हिंसाचारापासून मागे हटणे आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन करतो. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या प्रदेशातील आमचे दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. प्रदेशात सुरक्षा आणि स्थिरता राखणे अत्यावश्यक आहे.” असंही भारताने म्हटलं आहे. (Iran Israel Attack)

भारतीयांनी स्वत:च्या सुरक्षेबद्दल दक्षता घ्यावी

इस्रायल आणि इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी स्वत:च्या सुरक्षेबद्दल दक्षता घ्यावी आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्वांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आपल्या नवाची नोंदणी करावी, असे आवाहनही परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. (Iran Israel Attack)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.