Iran-Israel: इराण-इस्रायलमध्ये तणावग्रस्त परिस्थिती, भारताकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

इराण आणि इस्रायलबरोबरच भारतीयांनी म्यानमारलाही जाणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

198
Iran-Israel: इराण-इस्रायलमध्ये तणावग्रस्त परिस्थिती, भारताकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

इराण आणि इस्रायलमध्ये अतिशय तणावग्रस्त परिस्थिती आहे. इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरूनच भारताने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून (Ministry of External Affairs) जारी केल्या आहेत. (Iran-Israel)

भारतीयांनी इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये प्रवास करू नये, असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिला आहे तसेच इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावर पराकोटीला पोहोचला आहे. पश्चिम आशियावर युद्धाचे सावट आहे. इस्रायलने ११ दिवसांपूर्वी इराणच्या सिरीयातील दूतावासावर हल्ला केला होता. त्यानंतर या दोन देशांतील तणाव कमालीचा शिगेला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे अमेरिकेसह काही देशांनी आपापल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Temple: अयोध्येत रामलल्लावर कसा होणार सूर्यतिलक अभिषेक, वाचा सविस्तर)

म्यानमारलाही जाणे टाळावे
भारतानेही शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जारी करून भारतीयांना खबरदारीचा इशारा दिला. इराण आणि इस्रायलबरोबरच भारतीयांनी म्यानमारलाही जाणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. म्यानमारच्या सित्वे शहरातील सुरक्षाविषयक परिस्थिती अस्थिर असल्याने तेथील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना यांगून शहरात हलवण्यात आले आहे. भारत म्यानमारमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

भारतीयांनी स्वत:च्या सुरक्षेबद्दल दक्षता घ्यावी
यापुढे इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी भारतीय कामगारांना पाठवले जाणार नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ६४ भारतीय कामगारांची एक तुकडी इस्रायलला पाठवण्यात आली होती तसेच एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत ६ हजारांहून अधिक कामगारांना इस्रायलला पाठवण्यात येणार होते. इस्रायल आणि इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी स्वत:च्या सुरक्षेबद्दल दक्षता घ्यावी आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्वांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आपल्या नवाची नोंदणी करावी, असे आवाहनही परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

पश्चिम आशियावर युद्धजन्य परिस्थिती…
इस्रायलने १ एप्रिलला सिरीयाची राजधानी दमास्कस येथे असलेल्या इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता. त्यापूर्वी इराणचे समर्थन असलेल्या हुती बंडखोरांनी इस्रायलमधील लष्करी तळांवर हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. सिरीयातील इराणी दूतावासावरील हवाई हल्ल्यात ठार झालेल्या २ लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा सूड घेण्याची धमकी इराण देत आहे. १ एप्रिलचा तो हल्ला इस्रायलनेच केल्याचा इराणचा आरोप आहे. इस्रायलने, मात्र अद्याप हल्ल्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र दोन्ही देशांतील वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियावर युद्धाचे ढग जमू लागल्याचे चित्र आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.