हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराणी फूटबाॅलपटूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार; व्हिडीओ होतोय व्हायरल

इराणमध्ये हिजाबविरुद्ध सुरु असलेल्या विरोधाच्या आंदोलनाची झळ ही कतार फुटबाॅल वर्ल्डकपमध्येही दिसून आली. सोमवारी इराण विरुद्ध इंग्लंड असा फुटबाॅल सामना खेळला गेला. यावेळी इराणचे खेळाडू मैदानावर पोहोचले. मात्र, यावेळी त्यांनी देशाचे राष्ट्रगीत म्हटले नाही. जोपर्यंत इराणचे राष्ट्रगीत वाजत होते, तोपर्यंत खेळाडूंच्या चेह-यावर कोणत्याही प्रकारच्या भावना दिसून आल्या नाहीत. भावनाहीन चेहरा घेऊन यावेळी सर्व खेळाडू मैदानावर उभे होते. इराणी खेळाडूंचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

गप्प उभे होते 11 खेळाडू

इराण फुटबाॅल टीमचा कर्णधार अलीरेजा जहानबख्शने सामन्यापूर्वी सांगितले की, इराणमधील सरकारविरोधी निदर्शकांच्या बाजूने राष्ट्रगीत गाण्यास नकार द्यायचा की नाही हे टीममधील खेळाडू एकत्र येऊन ठरवतील. या विधानानंतर इराणची टीम खलीफा इंटरनॅशनल स्टेडियमवर उतरली. यावेळी आपल्या देशाचे राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर भावशून्य होऊन सर्व खेळाडू शांत उभे होते.

( हेही वाचा: मुंबईत पार्किंगसाठी सरकारचे काही धोरण आहे का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल )

काय आहे नेमकं प्रकरण?

इराणी महिला महसा आमिनी हिच्या मृत्यूनंतर इराणमधील ही निदर्शने उग्र बनली आहेत. महसा आमिनी ही वायव्य इराणमधील साकेज शहरातील कुर्दिश महिला होती. तीन दिवस कोमात राहिल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी तेहरानमधील रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी इराण पोलिसांनी तिला अटक केली होती. आमिनीने ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याचा आणि हिजाब घातला नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. साकेज येथे आमिनीची अंत्ययात्रा निघाली तेव्हा हजारो महिलांनी त्यांचे हिजाब फेकून सरकारविरोधी घोषणा दिल्या होत्या. अजूनही इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलने सुरु आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here