Central Railway: ‘हे’ लोक करत आहेत मध्य रेल्वेला ‘श्रीमंत’!

विना तिकिट प्रवाशांकडून गेल्या चार महिन्यांत मध्य रेल्वेला 126 कोटींची कमाई

विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी सुरू आहे. तसेच तिकीटविना प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विना तिकिट प्रवाशांकडून गेल्या चार महिन्यांत मध्य रेल्वेला 126 कोटींची कमाई केली असून हे लोक मध्य रेल्वेला श्रीमंत बनवत आहेत.

चार महिन्यांत विक्रमी महसूल जमा

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल-जुलै २०२२ या पहिल्या चार महिन्यांत १२६.१८ कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला. जुलै -२०२२ या महिन्यात, मध्य रेल्वेने बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या ३.२७ लाख प्रकरणांद्वारे रु.२०.६६ कोटींचा महसूल नोंदवला आहे. एप्रिल ते जुलै २०२२ या महिन्यात, विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण १८.३७ लाख प्रकरणे आढळून आली आहेत, तर मागील वर्षी याच कालावधीत ७.४९ लाख प्रकरणे आढळून आली असून त्यात १४५.१७ टक्केची वाढ दिसून आली आहे.

(हेही वाचा – ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव! 6 बाजूंनी नाकाबंदी, हवाई क्षेत्रात गोळीबार)

अशा विनातिकीट/अनियमित प्रवासातून मिळालेल्या महसुलात म्हणजेच एप्रिल ते जुलै २०२२ साठी रु.१२६.१८ कोटी नोंदवले गेले आहेत, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत नोंदवलेल्या रु ४५ कोटी महसुलाच्या तुलनेत १८० टक्क्यांची वाढ दर्शवतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here