प्रवासी म्हणून काही अधिकार आहेत. बर्याच लोकांना माहित असेल की फ्लाईटला विलंब झाल्यास एअरलाइन्स कंपन्या प्रवाशांना नाश्ता, जेवण इत्यादी सुविधा देतात. आता भारतीय रेल्वे, IRCTC ने देखील अशाच सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. गाडीला उशिर झाल्यास रेल्वे देखील प्रवाशांना काही मोफत सेवा पुरवणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – पुण्यात FDA ची मोठी कारवाई! गणेशोत्सवात ९०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त)
तुमच्या ट्रेनला उशीर झाल्यास, IRCTC तुम्हाला अन्न आणि थंड पेय पुरवेल. हे जेवण तुम्हाला IRCTC कडून पूर्णपणे मोफत पुरवले जाते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जेव्हा गाड्यांना उशीर होतो, तेव्हा प्रवाशांना IRCTC च्या खानपान धोरणानुसार नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते.अशा प्रकारच्या सेवा हा प्रवाशांचा हक्क आहे.
कोणाला मिळणार मोफत सुविधा
ट्रेनला उशीर झाल्यास, प्रवासी आयआरटीसीच्या नियमांनुसार मोफत जेवू शकतात. जेवणाच्या धोरणानुसार, गाडी दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास शताब्दी, राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
‘या’ सुविधा पुरविल्या जातात
- न्याहारी चहा किंवा कॉफी आणि बिस्किटे,
- चहा किंवा कॉफी आणि ब्रेडचे चार स्लाइस
- संध्याकाळचा नाश्ता म्हणून एक पाव बटर
- पॉलिसीनुसार IRCTC प्रवाशांसाठी जेवणही पुरवते.