Indian Railways: ट्रेनमध्ये कोणी तुमची सीट बळकावली तर असा द्या दणका!

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांचा नेहमीच विचार करत असते, त्यामुळे रेल्वे आपल्या सुविधा सतत अपडेट करत असते. आता तुम्ही ट्रेनच्या तिकीटापासून ते जेवणापर्यंत घरबसल्या काहीही ऑर्डर करू शकता. पण कित्येकदा अशी तक्रार ऐकायला मिळते की, तुम्ही बुक केलेल्या सीटवर दुसरीच व्यक्ती कब्जा करून बसते. अशावेळी सीटवर बसलेली व्यक्ती त्या जागेवरून उठताना वाद-विवाद करते तर काहीवेळा एकाच जागेवर दोन व्यक्ती अॅडजस्ट होण्याचा सल्ला देखील ती व्यक्ती देते. अशा परिस्थितीत तुम्ही त्या व्यक्तीशी डोकं न लावता रेल्वेकडे तक्रार नोंदवून तुमची सीट रिकामी करून आरामात बसू शकतात.

रेल्वेच्या मदतीने मिळवा हक्काची सीट

भारतात ट्रेनमधील सीटवर कब्जा करण्याची चर्चा काही नवीन नाही. तर अनेकदा रेल्वेत अशी प्रकरणे समोर येत असतात. सेकेंड क्लास आणि स्लीपरपासून ते एसी क्लासपर्यंत अनधिकृत प्रवासी (Unauthorized Passenger) बसलेले दिसतात. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल आणि यावेळी तुमच्या आजूबाजूला टीसी नसेल तर तुम्ही ‘रेल्वे मदद’ वर तक्रार नोंदवू शकता. या तक्रारीनंतर तुम्ही तुमची हक्काची सीट देखील मिळवू शकतात.

(हेही वाचा – तुम्ही चहाचे शौकिन आहात? तर चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी)

अशी नोंदवा तक्रार

अनधिकृत प्रवासी (Unauthorized Passenger) ची तक्रार करून सीट रिकामी करण्यासाठी रेल्वे मददच्या वेबसाइटवर तुम्हाला भेट द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला https://railmadad.indianrailways.gov.in येथे क्लिक करून तुमचा काही तपशील भरावा लागेल

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
  • आता तुमच्या मोबाईलवर आलेला OTP तेथे टाका
  • यानंतर तुम्ही तुमच्या तिकीट बुकिंगचा PNR क्रमांक टाका.
  • आता Type या पर्यायावर क्लिक करून तुमची तक्रार निवडा. त्यानंतर घडलेल्या घटनेची तारीख निवडा.
  • याठिकाणी तुम्ही तुमची तक्रार सविस्तर लिहू शकता. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

(हेही वाचा – Railway Jobs 2022: रेल्वेत नोकरीची संधी! दरमहा 35,400 पगार, कोणत्या पदांवर होणार भरती?)

139 वरही तक्रार करू शकता

जर कोणी प्रवाशाच्या आरक्षित सीट किंवा बर्थवर बेकायदेशीरपणे कब्जा केला असेल, तर सर्वप्रथम हे प्रकरण त्या ट्रेनच्या टीसीपर्यंत पोहोचले पाहिजे. जर तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकत नसाल तर तुम्ही रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वरही तक्रार नोंदवू शकता, असे रल्वे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here