ज्यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला, ते साप पकडणारे ‘दोघे’ जण आहेत तरी कोण?

128

केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित केले आहेत. यातील अनेक नाव अशी आहेत, जी अपरिचित आहेत. ज्यांना याआधी कधी विशेष प्रसिद्धी मिळाली नाही अशी नावे सरकारने निवडली आहेत, याबद्दल सरकारचे कौतुक करायला हवे. खरोखर समाजासाठी काम करणार्‍यांची नावे गेल्या ५ – ६ वर्षांपासून समोर येत आहेत. यामध्ये इरुला जमातीच्या वदिवेल गोपाल आणि मासी सादियान ही नावे देखील आहेत. आपण या दोन्ही अवलियांबद्दल जाणून घेणार आहोत.

तामिळनाडूतील वदिवेल गोपाल आणि मासी सादियान हे दोघे मित्र इरुला जमातीचे आहेत. दोघांना नुकताच पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. या दोघांचे शिक्षण जरी जास्त झाले नसले तरी साप कसा पकडावा याचे शिक्षण देण्यासाठी ते जगभरात फिरतात. ते स्वतः साप पकडण्यात तरबेज आहेत. त्यांना ही कला परंपरागत लाभली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपारिक व स्वदेशी पद्धतीने ते साप पकडतात.

हे दोन्ही मित्र साप पकडण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. २०१७ रोजी फ्लोरिडा विश्वविद्यालयने प्रायोजित केलेल्या एक पायलट पायथन डिटेक्शन प्रकल्पासाठी दोघांना फ्लोरिडामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं गेलं आणि या दोघांनी तिथे मोठा पराक्रम केला. वदिवेल आणि मासी यांनी बर्मीज अजगरांची शिकार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय टीमला मदत केली होती आणि दोघांनी मिळून अमेरिकेत २५ पेक्षा जास्त अजगर पकडले. त्यांच्या या पराक्रमासाठी केंद्र सरकारने त्यांचा सन्मान करण्याचे ठरवले आहे.

सरकारच्या मते इरुला जमात एंटिव्हेशनच्या संग्रहात सहकार्य करुन भारताच्या आरोग्य सेवा पर्यावरणशास्त्र तंत्रामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहे आणि हे दोघे पुरस्कार विजेत्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिलेल्या ज्ञानाचा वापर करत आहेत. सरकारने दोघांचेही कौतुक करत म्हटले की, हे दोघे धोकादायक आणि विषारी साप पकडण्यात तरबेज आहेत आणि इतरांनाही ते प्रशिक्षण देतात. वदिवेल गोपाल आणि मासी सादियान इरुलर स्नेक कॅचर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य आहेत आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. वदिवेल गोपाल आणि मासी सादियान यांनी भारताचा मान वाढवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.