सध्या जगभरात AI तंत्रज्ञानाचा बहुतांश क्षेत्रात वापर होऊ लागला आहे. त्यामुळे AI तंत्रज्ञान चांगले कि वाईट यावर साधक बाधक चर्चा होऊ लागली आहे, याचे फायदे आणि तोटे यावर खल सुरु झाला आहे. अशातच आधीचे ट्विटर आणि आताचे एक्स या सोशल मीडियाच्या महत्वाच्या प्लॅटफॉर्मची मालक आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी मांडलेली मते महत्वाची ठरत आहे. स्वतः ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या विषयावर मस्क यांची मुलाखत घेतली. तेव्हा मस्क यांनी यावर सविस्तर मते मांडली.
काय म्हणाले एलन मस्क?
- मी बराच काळ तंत्रज्ञानाशी निगडीत आहे, म्हणून मी AI येत असल्याने बरेच यश आले. AI च्या माध्यमातून तुमचा व्हिडिओ तयार करू शकतो. त्यानंतर आम्ही चॅट GPT 1, GPT 2, GPT 3 आणि 4 आघाडीवर असल्याचे पाहिले. हे तंत्रज्ञान मानवी बुद्धिमतेच्या खूप पुढे आहे.
- AI मुळे एक वेळ अशी येईल की, नोकरीची गरज भासणार नाही. AI सर्वकाही करण्यास सक्षम असेल. तो जादुई जिनीसारखा असेल.
- AI नोकर्या भूतकाळातील गोष्ट बनवेल. हे चांगले आणि वाईट दोन्ही आहे.
- AI मध्ये सुरक्षेच्या समस्या आहेत, विशेषत: ह्युमनॉइड रोबोट्सच्या बाबतीत. कार सर्वत्र तुमचा पाठलाग करू शकत नाही, परंतु जेव्हा एआयला ह्युमनॉइड रोबोटसह एकत्रित केले जाते, तेव्हा ते सर्वत्र तुमचे अनुसरण करण्यास सक्षम असेल.
- माझ्या मुलाला मित्र बनवताना त्रास होतो आणि AI त्याच्यासाठी चांगला मित्र असेल.
- नोकरी गमावणे ही वाईट गोष्ट नाही. काही नोकऱ्या गैरसोयीच्या, धोकादायक आणि त्रासदायक असतात. त्या नोकर्या करण्यात संगणकाला कोणतीही अडचण येणार नाही. स्वयंपाक करणे मजेदार आहे, परंतु भांडी धुणे नाही.
(हेही वाचा Pune University ला JNUची लागण; का बनले वातावरण तणावग्रस्त? )
Join Our WhatsApp Community