घटनेतील कलम ३७० च्या (Article 370) तरतुदी रद्द करण्याचे केंद्राचे पाऊल घटनात्मकदृष्ट्या वैध होते का? जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० च्या तरतुदी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज म्हणजेच सोमवार, ११ डिसेंबर रोजी आपला निकाल जाहीर करणार आहे.
याच पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, जेव्हा निवडणूक आयोग (ईसी) या प्रकरणात अंतिम निर्णय घेईल तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये (Article 370) विधानसभा निवडणुका घेण्यास सरकार तयार आहे.
(हेही वाचा – Dheeraj Sahu: नोटांचा डोंगर घरात सापडला, धीरज साहू अडचणीत)
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमुर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे घटणापीठ हा निकाल देणार आहेत. (Article 370)
Supreme Court to pronounce judgement on the batch of petitions challenging the abrogation of Article 370 in Jammu and Kashmir, today pic.twitter.com/5g6Yqabamr
— ANI (@ANI) December 11, 2023
केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू – काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम ३७० (Article 370) रद्द केले. त्यामुळे राज्याची जम्मू – काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी केली होती.
(हेही वाचा – Halal Ban: उत्तर प्रदेशात हलाल बंदी; महाराष्ट्रात कधी?)
याच प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात २ ऑगस्टपासून युक्तिवाद (Article 370) सुरू झाला होता. या युक्तिवादाचा आज अखेर निकाल लागणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community