उदयपूरमधल्या कन्हैयालाल यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली म्हणून इस्लामी अतिरेकी रियाझ मोहम्मद अत्तारी आणि गौस अहमद या दोघांनी कन्हैयालालची माणुसकीला लाजवेल अशा पद्धतीने निघृण हत्या केली. आता या केसचा तपास एनआयए करत आहे. या हत्याकांडाचे कनेक्शन्स पाकिस्तानपर्यंत पोहोचल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झालेला आहे. पाकच्या विदेशी मंत्रालयाने हे आरोप नाकारले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आपली बदनामी करत असल्याचं पाकने म्हटल्याचं कळतं.
उदयपूर हत्याकांडाचे कनेक्शन्स पाकिस्तानपर्यंत
या दोन्ही इस्लामी आतंकवाद्यांचं दावते-इस्लामी या पाकच्या संघटनेशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार गौस महम्मद हा आरोपी २०१४ मध्ये ४५ दिवसांसाठी कराचीला गेला होता. त्याने २०१८-१९ दरम्यान अरब देश आणि नेपाळमध्ये प्रवास देखील केला होता. गेली दोन वर्षे त्याचं पाकिस्तानच्या काही फोन नंबरवर बोलणं व्हायचं असं आढळलेलं आहे. तर दुसरा आरोपी मोहम्मद रियाज पाकच्या दावते-इस्लामी या आतंकवादी संघटनेने प्रभावित झाला असल्याचं म्हटलं जात आहे. या अतिरेक्यांनी २६ वेळा कन्हैयालावर चाकूने हल्ला केला व १३ वेळा त्यांच्या शरीराला कापण्यात आलं, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आढळलं आहे.
( हेही वाचा : संजय राऊत आता गप्प बसून काय फरक पडणार आहे? )
इसिस ही अतिरेकी संघटना पूर्वीपासूनच भारतात सक्रिय असल्याचं बोललं जात आहे. आपल्याकडून काही मुस्लिम तरुण अशा अतिरेकी संघटनांमध्ये सामील झाल्याच्या बातम्या देखील झळकल्या होत्या. या संघटना मुस्लिम तरुणांना भडकवून अतिरेकी गटात सामील करुन घेतात. भारताला नष्ट करणं हाच त्यांचा प्रमुख हेतू आहे. त्यासाठी मुस्लिम तरुणांना इस्लामच्या नावाखाली भडकवणं खूप सोपं आहे. अगदी उच्च शिक्षित तरूण देखील अशा अतिरेकी संघटनेकडे आकृष्ट होतात. त्यामुळे भारतासाठी येणारा काळ हा आव्हानात्मक असणार आहे. गेल्या काही वर्षांत आंदोलनांच्या नावाखाली झालेल्या दंगली ह्या जिवंत उदाहरण आहेत.
Join Our WhatsApp Community