सध्याचं युग डिजिटल असून सर्व जण स्मार्ट फोनचा आवर्जून वापर करताना दिसतात. इतकेच नाही तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन असतो. सर्वच स्मार्टफोनमध्ये अपडेटेड सुविधा असतात यापैकीच एक म्हणजे सर्वाधिक वापरली जाणारी ब्लूटूथ Bluetooth सुविधा. सध्या सर्वच जण ब्लूटूथ हेडफोन देखील वापरताना दिसतात, यामुळे युजरला त्याच्या फोनचे ब्लूटूथ हे कायम सुरूच ठेवावे लागते.
(हेही वाचा – फूड डिलिव्हरीनंतर Amazon आता देशात ‘ही’ सेवा बंद करणार!)
अनेकदा युजर ब्लूटूथ मोडवर आपला फोन ठेवतात. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोनचे ब्लूटूथ कुणीही सर्च करू शकते. त्यामुळे अशा गोष्टींवर हॅकर्सचे कायम लक्ष असतेच. हॅकर्स या माध्यमातून तुमच्या डिव्हाइसचा डेटा अॅक्सेस करू शकतात. त्यामुळे प्रायव्हसी आणि सिक्युरिटीच्या पातळीवर ही गोष्ट तुमच्यासाठी मोठी अडचणीची ठरू शकते. यापासून तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुमच्या स्मार्टफोनचे ब्लूटूथ कायम सुरू राहणार नाही याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
ब्लूटूथ तुम्ही ऑन ठेवलं आणि तुम्ही त्याचा उपयोग डिव्हाईस पेअरिंगसाठी करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे. यापासून तुम्हाला तुमचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला BlueBugging म्हणजे नेमके काय आहे, हे जाणून घ्यावे लागणार आहे. BlueBugging यामुळे तुमचा मोबाइल कंट्रोल केला जातो. BlueBugging सोबतच हॅकर्सकडून Bluesnarfing आणि Bluejacking चाही वापर करुन मोबाईल यूजरचा डेटा अॅक्सेस केला जाऊ शकतो.
BlueBugging चा हल्ला सर्वाधिक जास्त धोकादायक मानला जातो. यामध्ये हॅकर्स युजरच्या डिव्हाईसचा अॅक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ब्लूटूथ कनेक्शनची मदत घेतली जाते. हॅकर्सकडून ब्लूटूथ कनेक्शनला अल्टर करत यूजरचा पासवर्ड आणि इतर डिटेल्स चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी हॅकरआधी यूजरच्या मोबाईलपर्यंत पोहोचतात आणि त्यामध्ये मालवेअर इन्स्टॉल करतात. यातून भविष्यातही यूजरच्या मोबाईलचा अॅक्सेस मिळवला जातो. तसेच हॅकर यूजरचे फोनवरील संभाषण देखील ऐकू शकतो जे त्याच्यासाठी घातक ठरू शकते.
Join Our WhatsApp Community