ISIS चा म्होरक्या अबू हसन अल- हमीशी अल- कुरेशीचा युद्धात मृत्यू; नव्या म्होरक्याचे नाव घोषित

124

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅंड सिरिया या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू हसन अल- हशीमी अल- कुरेशीचा मृत्यू झाला आहे. एका युद्धादरम्यान, कुरेशीचा मृत्यू झाल्याची माहिती इसिस संघटनेने जाहीर केली आहे.

इसीसच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आमचा नेता कुरेशी शत्रूंशी लढताना युद्धात मारला गेला आहे. या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने एक ऑडिओ संदेश जारी करत ही माहिती दिली असून, इसिसच्या नवीन नेत्याच्या नावाची घोषणाही केली आहे. दरम्यान, कुरेशीच्या मृत्यूची तारीख किंवा दिवस याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अबू हसन अल- हाशिमी अल- कुरेशी हा इसिसचा तिसरा प्रमुख होता. यावर्षी फेब्रुवारीमध्ये दहशतवादी संघटनेचा दुसरा प्रमुख अबू इब्राहिम अल- कुरेशीला अमेरिकेने हवाई हल्ल्यात उत्तर सिरियातील इदलिब प्रांतात ठार केले होते. त्याआधीचा इसिस नेता अबू बक्र अल- बगदादी हाही ऑक्टोबर 2019 मध्ये इदबिलमध्येच मारला गेला होता. अबू हसन- अल-हाशिमी अल- कुरेशी हा इसिसचा पहिला म्होरक्या अल बकर अल- बगदादीचा भाऊ असल्याचे सांगण्यात येते.

हा आहे इस्लामिक स्टेट ऑफ इराकचा नवा नेता 

अबू अल -हुसेन अल -हुसेनी अल- कुरेशी हा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅंड सिरिया या गटाचा नवीन नेता असणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने उत्तर सिरियातील इदलिब प्रांतात हवाई हल्ला करत इसिसचा याआधीचा नेता अबू इब्राहिम-अल-कुरेशी याला ठार केले होते. त्याआधीच इसिस नेता अबू बक्र अल-बगदादी हाही ऑक्टोबर 2019 मध्ये इदलिबमध्येच मारला गेला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.