इस्रायल-हमासलच्या युद्धाला (israel-hamas-conflict) ७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. या युद्धामध्ये हमासकडून वापरण्यात येणाऱ्या भुयारांचे प्रचंड मोठे जाळ उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली ही कारवाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता, इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योआव्ह गॅलंट ( defense minister yoav gallant ) यांनी दिली आहे तसेच हमासची भुयारे नष्ट करण्याचे मोठे आव्हान सैन्यापुढे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
इस्त्रायलने गाझामध्ये शिरून लष्करी कारवाई करण्यासाठी सीमेवर आपल्या फौजा सज्ज ठेवल्या आहेत. इस्रायलची लढाऊ विमाने आणि ड्रोनने हवाई हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीच्या सीमाभागांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती
इस्रायलच्या सैन्यामार्फत देण्यात आली. या हल्ल्यामुळे शत्रू उघड होऊन अतिरेक्यांना ठार मारता येते, अशी माहिती इस्त्रायली सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी दिली.