इस्रायलने रविवारी ‘अल जझीरा’ वृत्तवाहिनीची स्थानिक कार्यालये बंद करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी दिला. ही वृत्तवाहिनी आणि इस्रायलमधील बेंजामिन नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतन्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने अल जझीराचे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाहिनीच्या कार्यालयावर छापा टाकून तिथे तपासणी करण्यात आली. त्यानंतर कार्यालय बंद करण्यात आले.
वृत्तवाहिनीचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इस्रायली अधिकाऱ्यांनी जेरुसलेम येथील हॉटेलमध्ये थाटलेल्या अल जझीराच्या कार्यालयात छापा टाकल्याची माहिती इस्रायल आणि रॉयटर्सच्या सूत्रांनी दिली. नेत्यनाहू सरकारच्या या निर्णयामुळे इस्रायलचा ‘अल जझीरा’विरुद्ध दीर्घकाळ चाललेला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Mumbai Metro: जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मेपर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?)
हवाई हल्ले आणि रक्तरंजित दृष्यांचे केले प्रसारण
इस्रायलचे ‘अल जझीरा’शी फार पूर्वीपासून कठोर संबंध असून, त्यांच्याविरुद्ध पक्षपाताचा आरोप केला आहे. ‘अल जझीरा’ वाहिनी आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांपैकी एक असून युद्धादरम्यान गाझामधील हवाई हल्ले आणि रुग्णालयांमधील रक्तरंजित दृश्यांचे त्यांनी प्रसारण केले आहे तसेच इस्त्रायलवर नरसंहार केल्याचा आरोपही केला आहे. अल जझीरावर पॅलेस्टाईनची कट्टरवादी संघटना असलेल्या हमासला सहकार्य केल्याचा आरोप इस्रायलकडून करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत इस्रायलने गाझामधील युद्ध सुरू असेपर्यंत अल जझीराचे प्रसारण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु हा निर्णय म्हणजे गुन्हेगारी कृत्य असून, इस्रायली सुरक्षेला धोका असल्याचा केलेला दावा धोकादायक आणि तितकाच हास्यास्पद होता, अशी प्रतिक्रिया अल जझीराकडून व्यक्त करण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयानंतर इस्रायली टीव्ही वाहिन्यांनी ‘अल जझीरा’चे प्रसारण थांबवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community