Israel-Hamas conflict: हमासच्या विरोधात इस्रायल एकटा उभा राहील, अमेरिकेच्या इशाऱ्याला पंतप्रधान नेतन्याहू यांनी काय दिले उत्तर?

123
Israel-Hamas conflict: हमासच्या विरोधात इस्रायल एकटा उभा राहील, अमेरिकेच्या इशाऱ्याला पंतप्रधान नेतन्याहू यांनी काय दिले उत्तर?

”हमासविरुद्धच्या युद्धात इस्रायल एकटा उभा राहील”, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी गुरुवारी, (९ मे) सांगितले आहे. की, गाझामधील रफाह शहरावर हल्ला करण्यासाठी अमेरिका इस्रायलला शस्रे पुरवणार नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी, (८ मे) दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नेत्यनाहू यांनी हे विधान केले आहे.

एका मुलाखतीत बायडेन म्हणाले की, अमेरिका अजूनही इस्रायलच्या संरक्षणासाठी वचनबद्ध आहे आणि रडार (आयर्न डोम रॉकेट इंटरसेप्टर्स) आणि इतर संरक्षणात्मक शस्त्रे पुरवेल, मात्र जर इस्रायलने रफाहमध्ये घुसखोरी केली, तर आम्ही शस्त्रे आणि तोफखाना पुरवणार नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला. रफाहबाबत इस्रायलने अद्याप मर्यादा ओलांडल्या नाहीत, परंतु गाझामधील नागरिकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी आणखी बरेच करण्याची आवश्यकता आहे तसेच रफाह येथे आश्रय घेतलेल्या १० लाखांहून अधिक नागरिकांची अमेरिकेला चिंता असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Kantilal Bhuria: “ज्यांच्या दोन बायका असतील त्यांना…” कांतीलाल भूरिया यांच्या वक्तव्याने मोठा वाद)

जो बायडेन यांच्या इशाऱ्यावर इस्रायलने नाराजी व्यक्त केली असून आम्हाला सुरुवातीपासून पाठिंबा दिला होता, असे इस्रायलचे दूत गिलाद इर्डन यांनी सांगितले तसेच बायडेन यांच्या वक्तव्यानंतरन “जर आपल्याला एकटे उभे राहावे लागले, तर आपण एकटेच उभे राहू. गरज भासल्यास आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने लढू. “, असे इस्रायली पंतप्रधान नेत्यनाहू म्हणाले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पंतप्रधान नेत्यनाहू यांचे उत्तर
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हागारी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “लष्कर ज्या मोहिमांची योजना आखत आहे त्यासाठी त्यांच्याकडे शस्त्रे आहेत आणि रफाहमधील मोहिमेसाठी जे आवश्यक आहे ते आमच्याकडे आहे. हमासचा शेवटचा बालेकिल्ला असलेल्या रफाहमध्ये नागरी जीवितहानी होण्याच्या अपेक्षेने अमेरिका इस्रायलला लष्करी कारवाईसाठी शस्त्रे पुरविणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितल्यानंतर डॅनियलची टिप्पणी आली आहे. इस्रायलचे अमेरिकेशी जवळचे संबंध आहेत आणि मतभेद बंद दाराआड सोडवले पाहिजेत, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.