Israel-Hamas conflict: हल्ल्याचा निषेध करणाऱ्या देशांमध्ये ‘भारता’चा समावेश, इस्रायलच्या राजदूतांचे महत्त्वाचे वक्तव्य

125
Israel-Hamas conflict: हल्ल्याचा निषेध करणाऱ्या देशांमध्ये 'भारता'चा समावेश, इस्रायलच्या राजदूतांचे महत्त्वाचे वक्तव्य
Israel-Hamas conflict: हल्ल्याचा निषेध करणाऱ्या देशांमध्ये 'भारता'चा समावेश, इस्रायलच्या राजदूतांचे महत्त्वाचे वक्तव्य

गेल्या तीन आठवड्यांपासून इस्रायल-हमास युद्धाची व्याप्ती (Israel-Hamas conflict) वाढत आहे, असे महत्त्वाचे विधान इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी केले आहे. इस्त्रायलवर हमासकडून ५ हजार क्षेपणास्त्रे डागून युद्धाला सुरुवात केली. त्यामुळे इस्रायलनेही प्रतिहल्ला करत युद्धाची घोषणा केली. इस्रायलनेही गाझामधील हमासच्या तळांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.

हल्ल्याची धुमश्चक्री दिवसेंदिवस वाढत आहे. युद्ध सुरू झाल्याला गेल्या तीन आठवड्यांचा काळ लोटला असून अजूनही या युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पार्श्वभूमीवर नाओर गिलोन यांनी केलेले विधान महत्त्वाचे ठरत आहे.

(हेही वाचा – VVS Laxman To Replace Rahul Dravid? ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्ही व्ही एस लक्ष्मण?)

इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी हमासविरोधात इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. इस्रायलने भारतातील उच्चपदस्थांशी याआधीच चर्चा केली आहे. हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्यासंदर्भात ही चर्चा झाली आहे. आता भारताने हमासला इतर अनेक देशांप्रमाणेच दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे, अशी मागणी गिलोनी यांनी केली आहे.

इस्रायलवर हल्ला झाल्यानंतर त्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारत होता. भारताच्या मताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नैतिक महत्त्व आहे. आमच्यासाठी महत्त्वाचे असणारे देश आमच्यासोबत आहेत. यामध्ये भारताचा समावेश आहे, असे विधानही गिलोनी यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.