इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel-Hamas conflict) गेल्या २९ दिवसांपासून सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांतील १०,००० हून अधिक लोकं मारले गेल्याची माहिती सोशल मिडियाद्वारे समोर आली आहे. इजिप्त आणि गाझा पट्टीमधील रफाह क्रॉसिंगच्या पूर्वेकडील केरेम शालोम ओलांडून मोठ्या संख्येने गाझामध्ये कामगार परतले.
इस्रायली सैन्याने सांगितले की, हमासचा पाडाव करण्यासाठी आणि ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले जाणार आहेत. दक्षिण गाझा पट्टीमधील रफाह येथील एका घरावर इस्रायली हल्ल्याच्या ठिकाणी पॅलेस्टिनी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
(हेही वाचा-Tourist Places in Jammu : जम्मू-काश्मीरची ट्रीप प्लॅन करण्यासाठी वाचा ‘या’ 10 टिप्स )
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दौऱ्यापूर्वी हे स्पष्ट केले की, गाझा पट्टीमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी ठोस पाऊले उचलली जाणार असल्याची माहिती दिली आहे तसेच अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही गाझामधून ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीचे आवाहन करण्यात आले आहे. तेल अविवनेही याविषयी स्पष्टिकरण दिले आहे.
युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेयर्स (OCHA) ने म्हटले आहे की, इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीमधील 2.7 दशलक्ष नागरिकांच्या आणि वेस्ट बँकमधील 500,000 लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 2023च्या अखेरीस अंदाजे 1.2 अब्ज डॉलर्स खर्च येईल. ओ. सी. एच. ए. चे प्रवक्ते जेन्स लार्क यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही भागांतील परिस्थिती ‘अधिकाधिक निराशाजनक’ झाली आहे. दहशतवाद्यांनी २४० लोकांचे अपहरण केले होते, त्यापैकी फक्त ४ जाणांना सोडण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community