इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israel Hamas War) यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि जागतिक नेत्यांचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) हे आज म्हणजेच गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत.
पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) इस्रायलला पोहोचले आहेत, जिथे ते मानवतावादी मदत गाझाला लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी दबाव टाकतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भेटीनंतर सुनक यांचा हा दौरा होत आहे.
या दौऱ्यादरम्यान (Israel Hamas War) इतर प्रादेशिक राजधान्यांना भेट देण्यापूर्वी सुनक इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेणार आहेत. यावेळी युद्धादरम्यान आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल ते शोक व्यक्त करतील. तसेच “प्रत्येक नागरिकाचा मृत्यू ही शोकांतिकाच आहे”, असे पंतप्रधान सुनक यांनी या दौऱ्याच्या आधीच सांगितले होते.
(हेही वाचा – Lalit Patil : ड्रगमाफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या ‘त्या’ दोघी पोलिसांच्या ताब्यात)
या आठवड्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) हे इस्रायलचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु बुधवारी १८ ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत त्यांच्या या दौऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. दरम्यान, परराष्ट्र सचिव जेम्स क्लेव्हरली येत्या काही दिवसांत इजिप्त, तुर्की आणि कतारमधील नेत्यांची भेट घेऊन इस्रायल आणि गाझामध्ये शांततापूर्ण तोडग्यासाठी पाठिंबा मागतील. (Israel Hamas War)
या दौऱ्यादरम्यान ब्रिटनचे परराष्ट्र सचिव गाझामध्ये मानवतावादी प्रवेश आणि हमासने ताब्यात घेतलेल्या ब्रिटीश नागरिकांच्या सुटकेबाबतच्या करारावर जोर देतील. (Israel Hamas War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community