हमास आणि इस्त्रायल युद्धाला (Israel Hamas War) आज म्हणजेच सोमवार २३ ऑक्टोबर रोजी १७ दिवस झाले आहेत. पण, अद्यापही इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. अशातच एक नोवा म्युझिक फेस्टिवलमधील दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ७ ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी नोवा म्युझिक फेस्टिवलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला.
इस्रायलच्या वॉर रूमने ट्विटरवर हमासच्या (Israel Hamas War) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे भयानक दृश्य शेअर केले आहे. त्यांनी काही व्हिडिओ शेअर केले आहेत. दहशतवाद्यांनी पद्धतशीरपणे नागरिकांना पळून जाण्याचे मार्ग रोखले आणि त्यानंतर हिंसाचाराची लाट उसळली ज्यात लोकांना त्यांच्या गाड्यांमधून गोळ्या घालणे आणि वाहनांना आग लावणे देखील समाविष्ट होते.
More horrific scenes from Be’eri: pic.twitter.com/wG04K9DJuB
— Israel War Room (@IsraelWarRoom) October 22, 2023
(हेही वाचा – Maratha Reservation : युद्ध पातळीवर येऊ नका मराठा आरक्षणासाठी वेळ लागू शकतो – गिरीश महाजन)
पायी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही (Israel Hamas War) लक्ष्य करण्यात आले. म्युझिक फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्यांनी पळून जाण्याचा अथक प्रयत्न केला. तेव्हा हमासच्या अतिरेक्यांनी शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गोळीबार केला, ज्यामुळे सुरक्षिततेचा कोणताही मार्ग उरला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community