हमास आणि इस्त्रायल युद्धाला (Israel Hamas War) जवळपास एक महिना झाला आहे पण, अद्यापही इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. अशातच आता इस्त्रायलने एक नवीन व्हिडीओ ट्विट करून त्यांची रणनीती दाखवून दिली आहे.
इस्त्रायलने आता पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या सैन्यावर (Israel Hamas War) आपले मोकाट कुत्रे सोडले आहे, जे हमासच्या सैनिकांवर हल्ले करत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याच्या सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट दिसून आली आहे.
नेतन्याहू यांच्या कार्यालयाचे (Israel Hamas War) प्रवक्ते ओफिर गेंडेलमन यांनी X (ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये एक बोगदा दिसत आहे, ज्यामध्ये गडद अंधार आहे आणि एक भयंकर कुत्रा बोगद्यात वेगाने धावत आहे, त्याच्या पाठीवर कॅमेरा लावलेला आहे.
A must watch: IDF attack dogs go after Hamas-ISIS terrorists inside their tunnels in the Gaza Strip and take them down.
Hear the terrorists scream. pic.twitter.com/K0DGkZciC8
— Ofir Gendelman (@ofirgendelman) November 4, 2023
(हेही वाचा – Ratan Dubey : खळबळजनक! भर सभेत नक्षलवाद्यांनी केली भाजप नेत्याची निघृण हत्या)
बेंजामिन नेतन्याहू (Israel Hamas War) यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते ओफिर गेंडेलमन यांनी व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की हा व्हिडिओ गाझा पट्टीचा आहे, जिथे IDF चे कुत्रे हमासच्या सैनिकांचा पाठलाग करून त्यांना मारत आहेत.
तसेच आयडीएफ (Israel Hamas War) म्हणजेच इस्त्रायली आर्मीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जमिनीवरील हल्ला सुरू झाल्यापासून 24 सैनिक मारले गेले तर 7 ऑक्टोबरपासून आतापर्यंत एकूण 341 सैनिक मारले गेले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community