Israel Hamas War : इस्त्रायली सेनेला मोठं यश; एअर स्ट्राईकमध्ये हमासचा टॉप कमांडर ठार

160
Israel Hamas War : इस्त्रायली सेनेला मोठं यश; एअर स्ट्राईकमध्ये हमासचा टॉप कमांडर ठार

इस्रायली सैन्याने रविवारी (१५ ऑक्टोबर) उत्तर गाझामधील (Israel Hamas War) रहिवाशांना हा प्रदेश रिकामा करण्यासाठी आणि गाझावर संभाव्य जमिनीवरील हल्ल्यापूर्वी दक्षिणेकडे जाण्यासाठी ३ तासांची मुदत दिली. इस्त्रायली लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘ही मोहीम सुरू झाल्यानंतर या भागाचे “सक्रिय लढाऊ क्षेत्रात” रूपांतर केले जाईल’ असा इशारा दिला आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सने (आय. डी. एफ.) यापूर्वी जाहीर केले आहे की ते गाझा (Israel Hamas War) पट्टीत हवाई, जमिनीवरील आणि नौदल अशा तिन्ही पद्धतीने हल्ला करण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा सीमेजवळ सैनिकांची भेट घेतली.

(हेही वाचा – Hate Speech on Kashmir : काश्मीरविषयीचे हेटस्पीच अरुंधती रॉय यांना भोवले; खटला चालवण्यास मंजुरी)

दरम्यान, इस्त्रायली लष्कराने (Israel Hamas War) केलेल्या हल्ल्यात हमासची अभिजात लष्करी शाखा नुखबा दलाचा एक प्रमुख कमांडर बिल्लाल अल-केद्रा याला ठार केले. या युद्धात आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला असून १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हमासचा कमांडर ठार

इस्रायली वायूदलाने शनिवारी (१४ ऑक्टोबर) रात्री केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हमासचा टॉप कमांडर बिलाल अल-कदरा ठार झाला आहे. वायूदलाने शनिवारी रात्री गाझा पट्टीतल्या हमासच्या अनेक तळांवर बॉम्बवर्षाव केला. गाजा पट्टीतल्या दक्षिण खान युनिस बटालियनवर केलेल्या हल्ल्यात बिलाल कदरा मारला गेला. बिलाल हा हमासच्या इस्रायलवरील (Israel Hamas War) हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी एक होता.

बिलालने इस्रायलच्या किबुत्स निरिम आणि निरओज प्रातांत घुसून इस्रायली (Israel Hamas War) नागरिकांची कत्तल केली होती. बिलाल हा अनेक इस्रायली महिलांचं अपहरण करणाऱ्यांपैकी एक होता. बिलाल कदरा हा पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादी संघटनेतही वरिष्ठ पदावर होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.