Israel Hamas War : गाझामधील 3 रुग्णालयांवर इस्रायली सैन्याकडून हल्ला

156
Israel Hamas War : गाझामधील 3 रुग्णालयांवर इस्रायली सैन्याकडून हल्ला

मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातील युद्ध सुरु आहे. या युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्रांचा मारा करत या युद्धाला सुरुवात केली, त्यानंतर हमासचा खात्मा करण्याासाठी इस्रायलही युद्धात उतरलं.

गाझा पट्टीवर इस्रायलचे हल्ले (Israel Gaza Attack) काही केल्या थांबत नाही आहेत. शुक्रवारी, 10 नोव्हेंबरला गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक रुग्णालयांच्या बाहेरही स्फोटांचा आवाज ऐकू आला.

(हेही वाचा – Israel Hamas War : ती’ ४५ मिनिटे आणि हमासच्या दहशतवाद्यांचा सुन्न करणारा उन्माद…)

अधिक माहितीनुसार, गाझातील 3 रुग्णालयांना इस्रायली सैन्यानं (Israel Hamas War) घेराव घातला आहे. गाझामधील अल-शिफा, अल-कुड्स, अल-रंतिसी आणि इंडोनेशियन रुग्णालये यासारख्या प्रमुख आरोग्य सुविधांच्या बाहेर इस्रायली सैन्याचे रणगाडे दिसले.

(हेही वाचा – Mumbra Thane Shivsena : ठाण्यात राजकारण तापले; उद्धव ठाकरे ‘या’ शाखेची करणार पाहणी)

या हल्ल्यानंतर इस्रायलने (Israel Hamas War) दावा केला आहे की, हमासच्या हॉस्पिटलखाली बोगदे आहेत, जे हमासच्या कारवायांचे तळ आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.