Israel- Palestine Conflict : इस्रायलचे मोठे नुकसान , २०३ लोकांना ठेवले ओलीस तर ३०६ जणांचा मृत्यू

दोन्ही बाजूंच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. एवढेच नाही तर इस्त्रायल आणि हमासकडून जोरदार बॉम्बफेक सुरू आहे.

226
Israel- Palestine Conflict : इस्रायलचे मोठे नुकसान , २०३ लोकांना ठेवले ओलीस तर ३०६ जणांचा मृत्यू
Israel- Palestine Conflict : इस्रायलचे मोठे नुकसान , २०३ लोकांना ठेवले ओलीस तर ३०६ जणांचा मृत्यू

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत ३०६ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हमासने गाझामध्ये किमान २०३ लोकांना ओलीस ठेवले असून ओलिसांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे  प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी गुरुवारी (१९ ऑक्टोबर) सांगितले. तसेच, ७ ऑक्टोबरपासून हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून ३०६ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे आयडीएफने असेही जाहीर केले. (Israel- Palestine Conflict )

दरम्यान, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते हगारी म्हणाले की, मृत आणि ओलीसांची ही संख्या अंतिम नाही, कारण आयडीएफ ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेल्या इस्रायलींची माहिती सतत गोळा करत आहे. काही प्रकरणांमध्ये कुटुंबांना माहिती देण्यात आली होती की, बरेच जण हमासच्या ताब्यात असल्याचा संशय इस्रायली सैन्याला आहे, असेही ते म्हणाले.याचबरोबर, हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसल्यानंतर, इस्रायलवर रॉकेट डागल्यानंतर आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला संपवण्याची शपथ घेतल्याने गाझामधील युद्ध जीवघेणे बनले आहे. (Israel- Palestine Conflict)

(हेही वाचा : Mumbai Crime : मुलाला देत होता सोनसाखळी चोरीचे प्रशिक्षण, पिता पुत्राला अटक)

दोन्ही बाजूंच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. एवढेच नाही तर इस्त्रायल आणि हमासकडून जोरदार बॉम्बफेक सुरू आहे. हमास संचालित गाझा आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, गेल्या ११ दिवसांत ३४७८ पॅलेस्टिनी ठार झाले आणि १२००० हून अधिक जखमी झाले आहेत.दुसरीकडे, इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये १४०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. दरम्यान, एका प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार, दक्षिण गाझा शहरातील एका घरावर हवाई हल्ला झाला, ज्यामध्ये सात लहान मुले ठार झाली. ही बातमी सोशल मीडियावर त्वरीत पसरली, कारण हॉस्पिटलच्या स्ट्रेचरवर शेजारी पडलेल्या मृत आणि रक्ताळलेल्या मुलांच्या भयानक प्रतिमा समोर आल्या, ज्यामुळे गाझा आणि वेस्ट बँकमध्ये संताप पसरला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.