इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israel Hamas War) यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे हे स्पष्ट करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन उद्या म्हणजेच १८ ऑक्टोबर, बुधवारी इस्रायलला जाणार आहेत, असे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी जाहीर केले.
नेतान्याहू यांच्याशी प्रदीर्घ चर्चेनंतर ब्लिंकन म्हणाले की, बायडेन इस्रायलशी एकजुटीचा पुनरुच्चार करतील, यावेळी गाझामध्ये जमिनीवरून हल्ला होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. (Israel Hamas War)
तेल अवीव येथे इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळाशी अनेक तास चर्चा केल्यानंतर ब्लिंकन (Israel Hamas War) यांनी पत्रकारांना सांगितले की, “हमास आणि इतर दहशतवाद्यांपासून आपल्या लोकांचे संरक्षण करण्याचा आणि भविष्यातील हल्ले रोखण्याचा अधिकार आणि कर्तव्य खरोखरच इस्रायलला आहे, हे बायडेन स्पष्ट करतील. या चर्चेदरम्यान, सायरन वाजल्याने त्यांना पाच मिनिटे बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागेल. ब्लिंकन पुढे म्हणाले की; इस्रायल हे राष्ट्रपती बायडेन यांना त्यांच्या युद्धाच्या उद्दिष्टांबद्दल आणि रणनीतीबद्दल आणि “नागरी जीवितहानी कमी होईल आणि हमासला फायदा होणार नाही अशा प्रकारे ते ऑपरेशन कसे चालवतील याबद्दल माहिती देतील.
(हेही वाचा – Ronaldinho : रोनाल्डिनो जेव्हा दुर्गा पूजेच्या मंडपात अवतरतो… )
ब्लिंकन म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने (Israel Hamas War) एक योजना विकसित करण्यास सहमती दर्शविली आहे ज्यामुळे बहुपक्षीय संघटनांकडून मानवतावादी मदत गाझामधील नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल.
उत्तर गाझामधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इस्रायल-हमास युद्ध (Israel Hamas War) पाच तास थांबवण्यात आलं होतं. पाच तासांचा युद्धविराम लागू करण्यात आला होता. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये हजारो लोक अडकले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी या प्रकरणावर चिंता व्यक्त करत म्हटलं की, ‘सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना पूर्णपणे जगण्याचा अधिकार आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्यांचे कोणतंही नुकसान होऊ नये.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community