Israel-Palestine Conflict : इस्त्रायलकडून गाझा शहर उद्ध्वस्त, ‘ही केवळ सुरुवात’…पंतप्रधान नेत्यनाहू यांचे आव्हानात्मक विधान

रुग्णालयांमध्येही मृतदेह ठेवायला जागा नाही

218
Israel-Palestine Conflict : गाझावर इस्त्रायलकडून जोरदार हल्ले, 'ही केवळ सुरुवात'... पंतप्रधान नेत्यनाहू यांचे आव्हानात्मक विधान
Israel-Palestine Conflict : गाझावर इस्त्रायलकडून जोरदार हल्ले, 'ही केवळ सुरुवात'... पंतप्रधान नेत्यनाहू यांचे आव्हानात्मक विधान

हमास-इस्त्रायलच्या (Israel-Palestine Conflict) युद्धाला आठ दिवस झाले. या युद्धाबाबत शत्रूवर आम्ही पूर्ण ताकदीनिशी हल्ला करणार आहोत, ही फक्त सुरुवात असल्याचे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांनी म्हटले आहे.

गाझा शहरातील तब्बल १० लाख लोकांना गाझा शहर सोडण्याचे आदेश इस्त्रायलच्या सैन्याकडून देण्यात आले आहेत. गाझा शहरावर इस्त्रायलकडून जोरदार हल्ले होत आहेत. इस्त्रायलचे ३.६० लाख सैनिक कोणत्याही क्षणी गाझावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. गाझा शहर उद्ध्वस्त झाले आहे. रुग्णालयांमध्येही मृतदेह ठेवायला जागा नाही, त्यामुळे ही केवळ सुरुवात असल्याची माहिती बेंजामिन नेत्यनाहू यांनी दिली आहे.

आतापर्यंत १९०० लोकांचा गाझा पट्टीवर मृत्यू झाला, तर ७६९६ लोकं जखमी झाले आहेत. इस्त्रायलमधील १३०० लोकं मृत्युमुखी पडले आहेत, तर जखमींचा २८०० च्या पुढे गेला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी १२० इस्त्रायली लोकंना ओलीस ठेवले आहे. या युद्धामुळे गाझा पट्टीतील ४ लाख २३ हजार लोकांना घरे सोडावी लागली आहेत. ३२ हजारांपेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त झाली आहेत याशिवाय हमासची अनेक ठिकाणेही उद्ध्वस्त झाली आहेत.

(हेही वाचा – Asian Games : एशियन गेम्स विजेत्यांना ‘युपी’ सरकारने भरभरून दिले; महाराष्ट्रातील खेळाडू मात्र उपेक्षित)

या युद्धजन्य परिस्थितीचा संपूर्ण ताकदीनिशी सामना करताना आणि शत्रूवर तुटून पडताना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी आम्ही शत्रूवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला करत आहोत. ही फक्त सुरुवात असून माझी योजना उघड करणार नाही, पण ही फक्त सुरुवात आहे, हे निश्चित अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे. यावर गाझामध्ये पाणी, वीज खंडित झाली असून खासगी सरकारी इमारती मोडकळीस आल्या आहेत. इस्त्रायलने गाझा रिकामा करण्यास सांगितले असून हे आम्हाला मान्य नसल्याची भूमिका पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांनी घेतली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.