Israel Palestine Conflict : इस्त्रायल पोलीस अधिकारी शत्रूशी दोन हात कसे करतात, सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल…

पोलीस अधिकारी अत्यंत वीरतापूर्वक सशस्त्र दहशतवाद्यांशी सामना करत आहेत.

151
Israel Palestine Conflict : इस्त्रायल पोलीस अधिकारी शत्रूशी दोन हात कसे करतात, सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल...
Israel Palestine Conflict : इस्त्रायल पोलीस अधिकारी शत्रूशी दोन हात कसे करतात, सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल...

दहशतवादी संघटना हमासने इस्त्रायलवर ( Israel Palestine Conflict)  हल्ला केल्यामुळे युद्ध पेटले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तिथली सर्वसामान्य जनता यामध्ये होरपळून निघत आहे. आजूबाजूला प्रचंड युद्धजन्य परिस्थिती असताना तेथील पोलीस अधिकारी अत्यंत वीरतापूर्वक सशस्त्र दहशतवाद्यांशी सामना करत आहेत.

पोलीस आणि सीमा पोलीस अधिकाऱ्यांनी नेटिव्होटच्या बाहेर असणाऱ्या दोन सशस्त्र दहशतवाद्यांना वीरतापूर्वक निष्प्रभ केले. त्यांच्या दोन हात करत तत्परतेने त्यांचा सामना केला. दहशतवादापासून आमच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही आघाडीवर काम करत राहू, असे प्रेरणादायी विधान ट्विटरवर शेअर करून इस्त्रायल पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये इस्त्रायली पोलीस अधिकारी गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांविरुद्ध कसे लढा देतात, हे या व्हिडियोमध्ये पाहायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.