Israel-Palestine Conflict : इस्त्रायलला ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून मदत

210
Israel-Palestine Conflict : इस्त्रायलला ब्रिटनच्या प्रंतप्रधानांकडून मदत
Israel-Palestine Conflict : इस्त्रायलला ब्रिटनच्या प्रंतप्रधानांकडून मदत

इस्त्रायलच्या (Israel-Palestine Conflict) मदतीसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी एक हेरगिरी करणारे विमान, दोन युद्धनौका, तीन मर्लिन हेलिकॉप्टर आणि सागरी कमांडोजची एक कंपनी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्याच आठवड्यात या कंपनीची स्थापना भूमध्यसागरात होणार आहे.

याविषयी पंतप्रधान ऋषि सुनक यांनी सांगितले की, त्यांनी इस्त्रायलला मदत करण्यासाठी रॉयल नेव्ही टास्क ग्रुप पाठवत आहेत. त्यांना पुढच्या आठवड्यात भूमध्य समुद्रात पाठवले जाईल. या लष्करी पॅकेजमध्ये एक P8 विमान, दोन रॉयल नेव्ही शिप-RFA लाइम बे आणि RFA Argus, तीन मर्लिन हेलिकॉप्टर आणि रॉयल मरीन कमांडोजच्या एका कंपनीचाही समावेश आहे. ते भूमध्य समुद्रात स्टँडबाय मोडवर राहतील. इस्त्रायलला त्यांची गरज निर्माण झाली की, ते जमिनीवर उतरवले जातील.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : व्हॉट्सॲप स्टेटसवर पॅलेस्टाईनचे समर्थन करणे पडले महागात; थेट पोलीस कोठडीत रवानगी)

‘आम्ही या आठवड्यात पाहिलेली दु:खद दृष्ये पुन्हा पाहू इच्छित नाही. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना नेहमीच पाठिंबा देऊ. आमचे जागतिक दर्जाचे सैन्य इस्रायलच्या समर्थनार्थ नेहमीच उभे असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.