इस्त्रायल-पॅलेस्टाईनमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा (Israel-Palestine Conflict) परिणाम शेअर बाजारावरही दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.
सोमवारी सकाळी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात घसरण झाली. विक्रीचा सपाटा सुरू झाल्याने शेअर बाजारात लाल झेंडा फडकला. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. सेन्सेक्समध्ये ५००, तर निफ्टीमध्ये १५०हून अधिक अंकांची घसरण झाली. बँक निफ्टीतही तब्बल ५४० अंकांची घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
Sensex falls 467.99 points to 65,527.64 points in early trade; Nifty declines 144.85 points to 19,508.65 points
— Press Trust of India (@PTI_News) October 9, 2023
तेलाच्या किमतीत ५ टक्के वाढ
इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम तेलाच्या किमतीवरही झाला आहे. इराण तेलाचा मोठा उत्पादक देश आहे. या युद्धामध्ये इराणने पॅलेस्टाइनला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती तब्बल ५ टक्के वाढल्या आहेत. एका बॅरलसाठी ८७ डॉलर मोजावे लागणार आहेत.