Israel Palestine Conflict : ‘ही तर फक्त सुरुवात’; बेंजामिन नेत्यानाहूंचा हमासला इशारा

217
Israel Palestine Conflict : 'ही तर फक्त सुरुवात'; बेंजामिन नेत्यानाहूंचा हमासला इशारा

आज म्हणजेच मंगळवार १० ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या दिवशी सुद्धा (Israel Palestine Conflict) इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील युद्ध सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत अनेक व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत. अशातच इस्त्रायलकडून गाझापट्टीत नागरी वस्त्या टार्गेट करण्यात आल्या. गाझापट्टीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. शनिवारी ७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यानंतर इस्रायलनेही चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून या युद्धाला सुरुवात झाली आहे. यामध्ये आतापर्यंत इस्रायली आणि पॅलेस्टिनी मिळून मृतांचा आकडा १३०० पार पोहोचला आहे.

ही तर फक्त सुरूवात

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Israel Palestine Conflict) सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे. नेतन्याहू यांनी काल म्हणजेच ९ ऑक्टोबर सोमवार रोजी सांगितलं की, “हमासविरूद्ध बदला घेण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.” यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं की, हमासचे दहशतवादी जिथे लपले असतील त्या ठिकाणांना लक्ष्य केलं जाईल. इस्रायल आणि हमासकडून अद्यापही हल्ले सुरुच आहेत.

(हेही वाचा – Israel Palestine Conflict : काँग्रेसची देशविरोधी भूमिका; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ठराव मंजूर)

१०० हून अधिक इस्रायली ओलीस

हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार (Israel Palestine Conflict) गाझामध्ये १०० हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले आहे. हमास अधिकारी मौसा अबू मारझौक यांनी रविवारी अरबी भाषेत ही माहिती दिली. वरिष्ठ इस्रायली अधिकारी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे. इस्रायलच्या सैन्याने सांगितले की, त्यांनी गाझाच्या सीमेवरील बहुतेक भागांवर नियंत्रण मिळवले आहे, शकडो लोकांना ठार (Israel Palestine Conflict) केले आणि डझनभर कैदी म्हणून घेतले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.