इस्त्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष (Israel-Palestine Conflict) आता अजूनच तीव्र झाला असून या संघर्षातील मृतांचा आकडा ११०० पर्यंत पोहोचला आहे. शनिवारी हमासने केलेल्या माऱ्यात ५००० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा मारा केला. यानंतर अवघ्या दोन तासांत संघर्षाचा भडका उडाला. यामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला.
हमासने सुमारे 100 हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवलं आहे. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात रक्तरंजित हल्ला मानला जात आहे. या संघर्षात 300 हून अधिक पॅलेस्टिनींचाही मृत्यू झाला आहे. इस्रायल सैन्यानेही गाझामधील हमासच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे. इस्रायल लष्कराने गाझापट्टीत रॉकेट हल्ले करत हमासला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
(हेही वाचा – News Click : भारताचे अडीच आघाड्यांवरील शत्रू )
हमासच्या हल्ल्यात २००० पेक्षा जास्त इस्त्रायली नागरिक जखमी झाले आहेत, तर १०० जणांचे अपहरण करण्यात आले आहे. इस्त्रायली लष्कराच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील ३७० लोक ठार झाले असून २२०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्त्रायली लष्कराच्या प्रत्युत्तरानंतर हमासने युद्ध तीव्र करण्याची घोषणा केली.
Join Our WhatsApp Community#WATCH | Gaza City: Aftermath of Israeli retaliation after Islamist movement Hamas attacked Israel, yesterday.
(Source: Reuters) pic.twitter.com/5XCYxRP2h0
— ANI (@ANI) October 8, 2023