इस्त्रायल आणि हमासचे युद्ध (Israel-Palestine Conflict) अजून भडकण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. हमासने इस्त्रायलमधील लोकांची निर्दयीपणे कत्तल केली. या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आणि केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हमासचे प्रमुख केंद्र असलेले गाझा शहर संपवण्याचा इस्रायलने ठाम निश्चय केला आहे.
त्यानंतर गाझा शहरातील लोकांना शहर सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे १० लाख लोकांनी गाझा शहरात सैन्य घुसवल्यास आम्हीही युद्धात उतरू शकतो, असा जोरदार इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे युद्ध अजून भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
(हेही वाचा – Israel Hamas War : ही तिसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात; इस्रायली इतिहासकारांनी व्यक्त केली भीती)
इस्त्रायलच्या मदतीला अमेरिकेच्या युद्धनौका आहेत. सध्या दोन्ही देशांचे एकमेकांवर बॉम्बवर्षाव सुरू आहे. इस्त्रायली सैन्याने ब्लू लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमेवर असलेल्या हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला करत ती ठिकाणे नष्ट केली.
Join Our WhatsApp Community