Sanjay Raut यांच्या ट्विटमुळे इस्त्रायल नाराज; थेट पत्र पाठवून मोदी सरकारकडे केली तक्रार!

233
Sanjay Raut यांच्या ट्विटमुळे इस्त्रायल नाराज; थेट पत्र पाठवून मोदी सरकारकडे केली तक्रार!

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ‘हिटलर’ या वक्तव्यावर आता थेट इस्रायलने नाराजी व्यक्त केली आहे. अशातच इस्त्रायलकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून संजय राऊत विरोधात तक्रार करण्यात आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

संजय राऊतांचे ट्विट नेमके काय?

मंगळवार 14 नोव्हेंबर रोजी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गाझा हॉस्पिटलमधील “गंभीर परिस्थिती” बद्दल एक ट्विट केले होते. हिंदीत भाष्य करताना त्यांनी लिहिले होते की “हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करतो हे आता समजले”. राऊत यांनी नंतर ट्विट डिलीट केले असले तरी तोपर्यंत इस्रायली अधिकाऱ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घेतला होता. हे ट्विट हटवण्यापूर्वी 293,000 पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने ही पोस्ट भारत सरकारला पाठवलेल्या मेलमध्ये देखील जोडली होती.

(हेही वाचा – Weather Update : देशातील ‘या’ सहा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा)

ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या सुरुवातीपासूनच राऊत (Sanjay Raut) इस्रायल-हमास युद्धाबाबत खूप बोलले आहेत. गेल्या महिन्यात, त्यांनी सत्ताधारी भाजपची तुलना दहशतवादी गटाशी केली होती आणि नंतर ते म्हणाले की भारत इस्रायलला पाठिंबा देत आहे कारण त्याने नरेंद्र मोदी सरकारला पेगासस “हेरगिरी” सॉफ्टवेअर पुरवले होते. (Sanjay Raut)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.