हमासच्या हल्ल्यानंतर अनेक देशांनी इस्त्रायलला मदतीचा हात पुढे केला. इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाच्या (Israeli-Palestinian Conflict) या धुमश्चक्रीत अमेरिका इस्त्रायलीच्या मदतीसाठी पुढे सरसावली असून त्यांनी इस्त्रायलला मदतीची मोठी घोषणा केली आहे.
या प्राणघातक हल्ल्यात आतापर्यंत ७०० हून अधिक इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या16शी फोनवर चर्चा केली. यानंतर त्याने भूमध्य समुद्रात युद्धनौकांचा ताफा पाठवला. अमेरिकेने F-35,F-15 आणि F-16या लढाऊ विमानांनाही अलर्टवर ठेवलं आहे.
(हेही वाचा – Raj Thackeray : पुन्हा एकदा ‘लाव रे व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये)
एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, हमासच्या या हल्ल्यात चार अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. इस्त्रायली सैन्य आणि हमास या दहशतवादी गट यांच्यात झालेल्या चकमकीमुळे देशभरातील बऱ्याच भागावर याचा परिणाम झाला. गाझा पट्टीमध्ये इस्त्रायली काउंटरच्या हल्ल्यानंतर ४५० हून अधिक मृत्यू झाले आणि सुमारे २,३०० लोकं जखमी झाले. एकूण मृत्यू १००० पेक्षा जास्त झाले आहेत.
This morning, I spoke with @IsraeliPM to express my full support for the people of Israel in the face of an unprecedented and appalling assault by Hamas terrorists.
We will remain in close contact over the coming days.
The U.S. will continue to stand with the people of Israel.
— President Biden (@POTUS) October 8, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community