इस्त्रायली सैन्य जमिनीवरील कारवाईसाठी सीमेवर सज्ज आहे. हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून गाझावर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत. इस्त्रायलने नागरिकांना उत्तर गाझा सोडून जाण्याचा सल्ला अनेक वेळा दिला होता, मात्र यावेळी इस्त्रायलने (Israel-Palestine Conflict) दिलेला हा शेवटचा सल्ला आहे.
‘उत्तर गाझातील सर्वसामान्य लोकांनी उत्तर गाझा रिकामे करावे अन्यथा त्यांनाही दहशतवाद्यांचे सहकारी समजून नष्ट केले जाईल. कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य लोकांची हानी व्हावी, ही आमची इच्छा नाही. यामुळे अनेक दिवसांपासून सातत्याने इशारा दिला जात आहे’, मात्र हा अंतिम इशारा समजावा, असा अखेरचा इशारा इस्त्रायल सैन्याने दिला असला, तरीही गाझातील नागरिकांकडे पलायनासाठी कुठलाही पर्याय नाही.
(हेही वाचा – ISRO : २०३५ सालापर्यंत अंतराळ स्टेशन स्थापन होणार, इस्त्रोच्या प्रमुखांची माहिती)
इस्त्रायल सैन्याने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना कधीही निशाणा बनवले जाणार नाही, तर केवळ ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, अशाच ठिकाणांवर एअरस्ट्राइक केले आहेत. आपल्या कुटुंबातील अथवा नात्यातील जे लोक दक्षिण गाझामध्ये गेले, त्यांचा इस्त्रायल हल्ल्यात मृत्यू झाला, त्यामुळे उत्तर गाझातील लोकं दक्षिण गाझात जाण्यास टाळाटाळ करत आहेत.
हेही पहा –