नुकताच इस्रोच्या आदित्य एल १ या (Aditya L1 Launch) यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1 Launch) यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांची बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.
दहा दिवसांपूर्वीच भारताने चंद्रावर इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. त्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने (Aditya L1 Launch) प्रवास सुरु केला आहे.
Aditya L1 Launch : आदित्य एल १ने घेतली सूर्याच्या दिशेने झेप
.
.
.
एकूण पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार प्रवास@isro @PMOIndia #ISRO #AdityaL1Launch #AdityaL1 #ISRO_ADITYA_L1 pic.twitter.com/qK5if64wou— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) September 2, 2023
(हेही वाचा – Aditya L1 : ‘आदित्य एल-1’ प्रक्षेपणासाठी तयार; ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहता येणार)
‘या’ पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार प्रवास
हे आदित्य (Aditya L1 Launch) यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल. चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. या संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
या सौरमोहिमेद्वारे (Aditya L1 Launch) सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.
या सौरमोहिमेसाठी (Aditya L1 Launch) इस्रोच्या यू.आर. राव उपग्रह केंद्रात तयार केलेला उपग्रह २ आठवड्यांपूर्वी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवर पोहोचवण्यात आला. येथूनच आदित्य एल-१ हे यान अवकाशात झेपावले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community