कालपर्यंत राजकीय नेते, अभिनेते यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत होते, मात्र आता एका आत्मचरित्राची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण हे आत्मचरित्र इस्रो (ISRO) चे प्रमुख एस. सोमनाथ यांचे आहे. अंतराळ संशोधनात इस्रोने एस सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोहीम राबवल्या, त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रात अंतराळ संशोधनातील अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी या आत्मचरित्रात काही वादग्रस्त खुलासे केले आहेत, ज्यामुळे वाद निर्माण झाला, ज्यामुळे त्यांनी आत्मचरित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय मागे घेतला.
या पुस्तकात त्यांनी इस्रो (ISRO)चे माजी प्रमुख के. सिवन यांच्याबद्दलही अनेक दावे केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पुस्तकातील काही मजकुरामुळे बराच वादंग माजला. त्यानंतर सोमनाथ यांनी आत्मचरित्र प्रकाशित करण्याचा निर्णय मागे घेतला. आत्मचरित्र प्रसिद्ध न करण्याचा निर्णय सोमनाथ यांनी घेतल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसले दिले आहे. आपण आत्मकथेतून कोणालाही जाणूनबुजून लक्ष्य केले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आत्मचरित्र लोकांना नवा मार्ग दाखवेल आणि प्रेरणा देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कोणाचेही मन दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे सोमनाथ म्हणाले.
(हेही वाचा MVA : महाविकास आघाडी नसून महा ‘ड्रग ‘आघाडी आहे; शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा घणाघात)
एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्र ‘निलावु कुदिचा सिम्हंगल’मध्ये चांद्रयान-२ मोहीम अपयशी ठरण्यामागील कारणांचा उल्लेख आहे. इस्रो (ISRO)चे माजी अध्यक्ष के. सिवान यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. चांद्रयान-२ मोहीम अपयशी ठरण्यामागे सॉफ्टवेअरमधील त्रुटी होत्या. पण खरी कारणं कधीच समोर आली नाहीत, असे सोमनाथ यांनी पुस्तकात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community