चंद्रयान -३ च्या यशानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या गगनयान मोहिमेकडे. इस्रो कडून आता पहिली मानवी मोहिम लाँच करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना इस्रो ने संगितले की याची महत्वाची चाचणी ही येत्या शनिवारी (२१ ऑक्टोबर) रोजी करण्यात येणार आहे. गगनयान मोहिमेतील अबॉर्ट मिशन-1 चे काय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. (ISRO Gaganyaan)
गगनयानही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. इस्रोची गगनयान मोहिम तीन टप्प्यांत असेल. दोन मोहिमा मानवरहित तर तिसरी मोहिम मानवी अंतराळ मोहिम असेल. पहिल्या टप्प्यात गगनयान मोहिमेत व्योमित्र नावाचा रोबोट अंतराळात पाठवण्यात येणार आहे. गगनयान मोहिमेत मानवासाठी अनूकुलता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी आधी रोबोट अवकाशात पाठवला जाईल.
पत्रकारांशी संवाद साधताना ISRO चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, TV-D1 ची पहिली मानवरहित चाचणी मिशन २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. गगनयान मोहिमेच्या प्रणाली ची चाचणी करण्यासाठी आणखी तीन चाचणी TV-D2, TV-D3 आणि TV-D4 करण्यात येतील.
इस्रोचं गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम असून या मोहिमेमुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठीच्या पहिल्या क्रू मॉड्यूल ची पहिली अबॉर्ट चाचणी घेण्यात येणार आहे. इस्रोकडून क्रू एस्केप सिस्टमची अबॉर्ट टेस्ट साठीची तयारी पूर्ण झाली आहे. अबॉर्ट टेस्टमध्ये सुमारे १७ किमी उंचीवर चाचणी वाहनापासून क्रू मॉड्यूल वेगळे होणे अपेक्षित असेल. गगनयान मोहिमेत जर कोणतीही अडचण आली तर, अंतराळवीरांना मॉड्यूलसह सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी क्रू मॉड्यूल अबॉर्ट टेस्ट केली जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास गगनयान मोहिमेसाठी एक महत्त्वपूर्ण ठरेल.
(हेही वाचा : Bomb Threat In Taj : मुंबईत पुन्हा बॉम्बची धमकी; ताजमध्ये तासभर कसून शोध)
अबॉर्ट टेस्ट कशी असेल?
गगनयान मोहिमेची अबॉर्ट टेस्ट कशी असेल याबाबत सविस्तर जाणून घ्या. अबॉर्ट टेस्ट ही अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी घेण्यात येणारी चाचणी आहे. गगनयान मोहिमेदरम्यान, काही तांत्रिक बिघाड किंवा अडचण आल्यास अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्याची तंत्रज्ञानाची ही चाचणी आहे. गगनयान अबॉर्ट टेस्टमध्ये गगनयानचं क्रू मॉड्यूलचं लाँच व्हेईकलद्वारे प्रक्षेपण करण्यात येईल. क्रू मॉड्यूलने अवकाशात भरारी घेऊन त्यानंतर ठराविक उंची गाठल्यानंतर क्रू मॉड्यूल रॉकेटपासून वेगळं होईल आणि समुद्रात लँड होईल. बंगालच्या उपसागरात क्रू मॉड्यूलने टचडाउन केल्यानंतर, भारतीय नौदलाचे जहाज आणि डायव्हिंग टीम वापरून क्रू मॉड्यूल पुन्हा ताब्यात घेईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community