अवकाशात झेपावणार ‘आदित्य’!

138

इस्त्रोच्या काही मोहिमा 2022 आणि 2023 या काळात निश्चित करण्यात आल्या होत्या. पण, मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यामुळे इस्त्रोच्या मोहिमांना स्थगिती मिळणार का हे स्पष्ट होत नव्हते. याचे स्पष्टीकरण  राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिले आहे. 2023 मध्ये होणारी गगनयान मोहिम तसेच 2023 च्या मध्यापर्यंत  सुर्याच्या अभ्यासासाठी आदित्य मोहिम इस्त्रोकडून होणार असल्याचं मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

गगनयान मोहिमेची तयारी जोरात

इस्त्रोच्या कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण मोहिमा जरी विलंबाने होणार असल्या तरी महत्वकांक्षी समानवी ‘गगनयान’ मोहिम २०२३ मधेच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. करोनाचा या मोहिमेच्या तयारीवर फारसा परिणाम झाला नसल्याचं उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताच्या संभाव्य अंतराळवीरांचे रशियामधील प्रशिक्षण, तसंच भारतातील मोहिमेसंदर्भातील तांत्रिक तयारी जाोराने सुरु असल्याचं जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. २०२३ मध्ये ही मोहिम होणार असून त्याआधी गगनयानची तयारी सिद्ध करणाऱ्या दोन मोहिमा होणार आहेत, त्यापैकी एका मोहिमेत एक मानवी रोबोटही पाठवला जाणार आहे.

आदित्य अंतराळात झेपावणार 

२०२२ मध्ये शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. तर २०२३ च्या मध्यापर्यंत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ नावाचा उपग्रह पाठवला जाणार असल्याचं उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर २०३० पर्यंत भारताचे अवकाश स्थानक कार्यरत झालेलं असेल, या दृष्टीने पावलं टाकली जात असल्याची माहिती विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जीतेंद्र सिंह यांनी दिली आहे.

 ( हेही वाचा: काँग्रेसला हरण्याची भीती? ऐनवेळी बदलला उमेदवार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.