‘इस्त्रो’च्या अवकाश मोहिमांना पुन्हा सुरुवात

ह्या मोहिमेची तयारी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथे युद्धपातळीवर सुरू आहे.

73

कोरोनाची दुसरी लाट ओसरुन जनजीवन सुरळीत होत असताना, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोनेही पुन्हा उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना सुरुवात केली आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस आधी भारतीय अंतराळ संशोधन संस्ठा (इस्त्रो) अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण देशातील पहिला प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह (Earth Observation Satelite) अवकाशात सोडणार आहे.

येत्या १२ ऑगस्टला इस्त्रो २२६८ किलो वजनाचा EOS-03 हा उपग्रह GSLV-F10 या प्रक्षेपकाद्वारे भूस्ठिर कक्षेत पाठवणार आहे. १२ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ४३ मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण निश्चित झाले आहे. ह्या मोहिमेची तयारी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथे युद्धपातळीवर सुरू आहे. GSLV-F10 या प्रक्षेपकाला प्रक्षेणासाठी सज्ज केले जात आहे.

(हेही वाचाः आता एटीएममध्ये कॅश नसेल, तर बँकांना भरावा लागणारा दंड)

काय आहे या उपग्रहाचा फायदा?

  • वातावरणातील धुकं-धूळ याबद्दल ताजी माहिती, आपत्कालीन व्यवस्ठापन अशा विविध गोष्टींसाठी.
  • भारतीय उपखंडातील विविध भागांची २४ तास सुस्पष्ट छायाचित्रे घेणे(रिअल-टाइम इमेज).
  • नैसर्गिक आपत्ती, एपिसोडिक इव्हेंट्स आणि कोणत्याही अल्पावधीच्या घटनांचे जलद निरीक्षण करण्यासाठी.
  • शेती, वनीकरण, खनिजशास्त्र, आपत्तीची चेतावणी, ढग, बर्फ, हिमनद्या आणि समुद्रशास्त्रासाठी वर्णक्रमीय स्वाक्षरी मिळवणे.

एक वर्षापासून होती प्रतीक्षा

सुरुवातीला, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेला उपग्रह ५ मार्च २०२० रोजी प्रक्षेपित केला जाणार होता. पण, काही तांत्रिक समस्यांमुळे शक्य झाले नाही. त्यानंतर लगेचच कोरोनामुळे देशात करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे प्रक्षेपण एका वर्षापेक्षा जास्त काळ प्रतीक्षेत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.