ISRO लवकरच लाँच करणार चांद्रयान-3!

111

इस्रो लवकरच चांद्रयान-3 लाँच करणार आहे. ही माहिती इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी दिली आहे. ते म्हणाले की, इस्रो लवकरच चांद्रयान-3 लाँच करणार आहे. या मोहिमेसाठी फक्त चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा वापर केला जाणार आहे. भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ चांद्रयान-3 मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत. त्याचबरोबर चांद्रयान-3 मोहिमेत इस्रोला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा -नौका खरेदी करण्याबाबत नौदलाचा ‘एल अँड टी’शी करार)

चांद्रयान-2 चे ऑर्बिटर वापरण्यात येणार

इस्रो लवकरच चांद्रयान-3 लाँच करणार याची मला खात्री आहे. तसेच यावेळी आम्ही यशस्वी होऊ. या मोहिमेसाठी चांद्रयान-2 चे ऑर्बिटर वापरले जाणार असून ते किफायतशीर ठरणार असल्याचेही डॉ. के. सिवन यांनी सांगितले. यासह त्यांनी पुढे असेही सांगितले, केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारने आम्हाला कुलशेखरपट्टणममध्ये भूसंपादनासाठी मंजुरी दिली याचा आम्हांला खूप आनंद आहे. आम्ही लवकरच तेथे देशाचे दुसरे प्रक्षेपण पॅड तयार करू शकू आणि इस्रो लवकरच चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाबाबत माहिती देईल.

तामिळनाडूमध्ये लाँच पॅड तयार होईल

इस्रोचे माजी प्रमुख म्हणाले, “आमच्या सर्व प्रकल्पांवर कोरोनामुळे मोठा परिणाम झाला होता, परंतु त्याच वेळी इस्रोने आपल्या रणनीतीवर काम केले, जेणेकरून आम्ही कठीण परिस्थितीतही व्यवस्थापन करू शकू. महामारीने रॉकेट लाँच करण्याचा एक नवीन मार्ग दिला, जो प्रत्येक मोहिमेत लागू केला जाईल. ” तामिळनाडूमध्ये 1200 एकर जमीन संपादन करण्यासाठी इस्रोच्या मंजुरीवर ते म्हणाले, “केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारने आम्हाला कुलशेखरपट्टणममध्ये भूसंपादनासाठी मंजुरी दिली याचा मला खूप आनंद आहे. लवकरच आम्ही येथे देशातील दुसरे लॉन्च पॅड स्थापित करू शकू.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.