ISRO Scientist Nambi Narayanan: इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन

244
ISRO Scientist Nambi Narayanan: इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन
ISRO Scientist Nambi Narayanan: इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन

नंबी नारायणन (Nambi Narayanan) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते क्रायोजेनिक विभागाचे प्रभारी होते. १९९४ मध्ये त्यांच्यावर खोटा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली होती. १९९६ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने त्यांच्यावरील आरोप काढून टाकले आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने १९९८ मध्ये त्यांना निर्दोष घोषित केले.

नंबी नारायणन यांचा जन्म १२ डिसेंबर १९४१ रोजी केरळ येथे झाला. त्यांच्या जीवनावर रॉकेट्री हा चित्रपट १ जुलै २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटामुळे लोकांना कळू शकले की त्यांनाअमेरिकेची अंतराळ संस्था NASA कडून ऑफर आली होती. पण ते देशभक्त असल्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव नाकारला.

(हेही वाचा-Municipal Corporation : मुंबईतील १३०० दिव्यांग व्यक्तींना मिळणार संगणक स्कॅनर आणि प्रिंटर, कसे आणि कुठे जाणून घ्या..)

ते इस्रोमध्ये क्रायोजेनिक डिव्हिजन ऑफिसर म्हणून काम करत होते. त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. गेल्या ४० वर्षांत इस्रोने ६५ उपग्रह अवकाशात पाठवले आहेत आणि हे सर्व नंबी नारायणन आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्यामुळे शक्य झाले आहे. असे म्हटले जाते की जर त्यांच्यावर हेरगिरी आणि देशद्रोहाचे खोटे आरोप केले गेले नसते तर भारत आज खूप पुढे गेला असता आणि मंगळ मोहीम १९९४ मध्येच यशस्वी झाली असती.

१९९४ मध्ये नारायणन (Nambi Narayanan) यांच्यावर दोन कथित मालदीव गुप्तचर अधिकारी मरियम रशीद आणि फौजिया हसन यांना महत्त्वपूर्ण संरक्षण गुपिते पुरवल्याचा खोटा आरोप लावण्यात आला होता. नारायणन यांच्याबरोबर डी. शशिकुमारन यांच्यावर लाखो किंमतीची गुपिते विकल्याचा आरोप होता. मात्र त्यांच्यावरील आरोप खोटे ठरले आणि नंबी नारायणन एक हीरो म्हणून समोर आले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.